प्राथमिक आरोग्य केंद्र, बिजुधावडी येथे कोविड 19 लसीकरण केंद्राचे उदघाट्न संपन्न झाले. मोगरदा सर्कल च्या जि. प. सदस्या सौं. सीमाताई प्रकाश घाडगे तथा धारणी पंचायत समिती चे उपसभापती श्री. जगदीश भाऊ हेकडे यांच्या हस्ते मध्ये कोविड -19 प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्राचे उदघाटन करण्यात आले. 60 वर्ष वयापेक्षा जास्त व्यक्तींना तसेच सहव्याधी असलेल्या 45 वर्ष वयापेक्षा ज्यांना उच्च रक्तदाब, मधुमेह, इतर गंभीर आजार आहेत अश्यांना सुद्धा ही लस मोफत लावण्यात येणार आहे. लसीचा पहिला मान बिजुधावडी येथील प्रतिष्ठित नागरिक श्री. रमेशजी मालवीय यांना मिळाला. ही लस सुरक्षित असून याने कुठल्याही प्रकारची गुंतागुंत आतापर्यंत आढळून आली नाही, करिता जास्तीत जास्त लोकांनी ही लस लावून घेण्याचे आवाहन बिजुधावडी केंद्राचे प्रभारी वै.अधिकारी डॉ.दिनेश अंभोरे यांनी कार्यक्षेत्रातील जनतेला केले आहे. लसीकरण दर आठवड्यातून 3 दिवस सोमवार, बुधवार व शुक्रवार रोजी सकाळी 10.00 ते 5.00 पर्यंत सुरु राहील. आधार कार्ड, ओळखपत्र, मोबाईल नंबर आणणे आवश्यक आहे.
बिजूधावडी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे कोविड लसीकरण केंद्राचे उदघाटन...
राजु भास्करे:-अमरावती जिल्हा प्रतिनिधी
