राज्य परिवहन महामंडळाच्या जळगांव जामोद आगाराच्या जळगांव जामोद – पुणे बसमध्ये वाहकाच्या चाणाक्षतेने राज्य परिवहन कर्मचाऱ्याची बनावट पास जप्त करण्यात आली. वाहक योगेश दत्तात्रय किवंडे बिल्ला क्रमांक 83056 हे 6 फेब्रुवारी 2021 रोजी बस पुणे ते जळगांव जामोद फेरीवर कर्तव्य बजावित होते. औरंगाबाद मध्यवर्ती बस स्थानकावरून सदर बस दु 3 वाजता जळगांव जामोदकडे निघाली.प्रवाशांना तिकिटे देत असताना एजाज पठाण यांनी रा. प कर्मचाऱ्याची मोफत प्रवास सवलत पास दाखविली. सदर पास बनावट असल्याची शंका वाहकाला आली असता त्यांनी हर्सुल पोलीस स्टेशनमध्ये बस थांबवून सदर पास व पासधारक प्रवाशाला पोलीसांच्या ताब्यात दिले. औरंगाबाद आगार क्रमांक 2 येथे सदर पासची तपासणी केली असता ती पास बनावट असल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलीस स्टेशनला वाहकाने तक्रार दिली.वाहक योगेश किवंडे यांच्या चतुराईने रा. प महामंडळाच्या अशा बनावट पास बनविल्या जात असल्याचा खुलासा झाला. आर्थिक नुकसान होण्यापासून वाचविले. या कामगिरीबद्दल विभाग नियंत्रक संदीप रायलवार, विभागीय वाहतूक अधिकारी अमृतराव कच्छवे यांनी वाहकाचा सत्कार केला.
जळगांव जामोद बसमध्ये आढळली बनावट पास, वाहकाने केली कारवाई..!
जळगांव जा.ता.प्रतिनिधी:-
