स्थानिक जळगाव जामोद शहरामध्ये राष्ट्रवादीचे काँग्रेसच्या शहराध्यक्ष्यांनी लावलेल्या थँक्यू मोदी सरकार या बॅनरने संपूर्ण जळगाव जामोद शहरामध्ये चर्चांना उधाण आले आहे या बॅनरच्या चांगल्याच चर्चा रंगत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकार्यांनी जळगाव जामोद शहरांमध्ये ठिक- ठिकाणी मोदी सरकार विरोधात पोस्टरबाजी तसेच थँक्यू मोदी सरकार हे बॅनर ठिकाणी लावण्यात आले आहेत.त्यामुळे या बॅनरची जळगाव जामोद शहरांमध्ये जोरदार चर्चा आहे देशांमध्ये पेट्रोल डिझेल गॅस यांच्या दरवाढीचा भडका उडाला आहे. या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत तसेच अनेक राज्यांमध्ये पेट्रोलच्या दराने शंभर चा टप्पा ओलांडला आहे आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे भाव कमी असताना सुद्धा अनेक दिवसापासून देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर किंचितही कमी झालेले नाहीत. उलट पेट्रोल डिझेल गॅस यांचे दर वाढतच आहेत.त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस ने मोदी सरकार विरोधात जळगाव जामोद शहरांमध्ये अशा प्रकारची पोस्टरबाजी केली आहे.
जळगाव जामोद शहरामध्ये राष्ट्रवादीने लावले थँक्यू मोदी सरकार चे बॅनर...
जळगांव जा.प्रतिनिधी:-
