आदिवासींच्या शेकडो एकर जमिनी गैरआदिवासींनी हडपल्या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या चौकशी समितीने चौकशीला प्रारंभ केला असल्याने यातिल जमीनीची हेराफेरी करणारे अनेक तलाठी,मंडळ अधिकारी समितीच्या रडारवर असल्याचे तपासातून दिसुन येत आहे. स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी केलेल्या लेखी तक्रार नुसार जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांनी १२ फेब्रुवारी रोजी त्रीसदस्य समीती नेमुन चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. ह्या चौकशी समितीचे प्रमुख खामगाव उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, मलकापूर उपविभागीय अधिकारी मनोज देशमुख यांनी २४ मार्च रोजी संग्रामपुर तहसिलला चौकशी प्रकरणी बैठक घेतली. घोटाळा प्रकरणी अनेक मुद्दे तपासुन. ह्या बाबत तक्रारदार प्रशांत डिक्कर यांच्या सोबत चर्चा केली. तहसिल कार्यालयातुन काही रेकॉर्ड ताब्यात घेतले असुन. ह्या घोटाळ्या प्रकरणी झालेल्या व्यवहार बाबत सब रजिस्ट्रार संग्रामपुर यांचेकडे कागदपत्रे मागवले आहेत. तलाठी, मंडळ अधिकारी यांनी गैरकायदेशीर गैरआदिवासींच्या नावावर बनावट कागदपत्रांच्या आधारे करुन दिलेल्या जमीनीवर सोनाळा स्टेट बँकेतुन करोडो रुपयांच्या जवळपास पिक कर्ज घेतले व ते कर्ज महात्मा फुले कर्ज माफि योजनेतुन माफ करून घेतले या बाबतही बँकेकडून माहिती मागवली आहे. ह्या चिचारी जमीन घोटाळ्याची व्याप्ती प्रचंड वाढलेली असल्याने यामधे दोशी असलेल्या तलाठी,मंडळ अधिकारी,व आदिवासींच्या जमिनी हडपणाऱ्या गैरआदिवासीनवर लवकरच कारवाई करा. आणी हडपलेल्या जमीनी आदिवासींना परत द्या. अशी मागणी प्रशांत डिक्कर यांनी यावेळी चौकशी समितीकडे केली आहे. विभागीय आयुक्तांकडे केलेल्या तक्रार नुसार सोनाळा भाग १ भाग २,लाडणापुर भाग १ भाग २, वसाळी आलेवाडी सायखेड ईत्यादी हलक्याची दप्तर निहाय वस्तुनिष्ट चौकशी होणार असल्याने हा भुखंड घोटाळा महाराष्ट्रभर गाजण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
आदिवासी शेतकऱ्यांच्या जमीन घोटाळा प्रकरणी चौकशी समिती संग्रामपुरात दाखल.जमिनी हेराफेरी करणारे अनेक तलाठी समितीच्या रडारवर....
संग्रामपूर ता.प्रतिनिधी:-
