कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी नियमितपणे मास्क सॅनिटायजर चा वापार करत राहावे असे आवाहन शिवछत्र मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष नंदकिशोर मापारी यांनी गणेश सोसायटी च्या प्रांगणात शिवछत्र मित्र मंडळ व शिवसेना याच्या संयुक्त विद्यमाने मास्क व सॅनिटायजर वाटपाचा कार्यक्रमाचे आयोजन केले होते.या कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून लोणार पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख, पोलीस उपनिरीक्षक भारत बर्डे,पोलीस उपनिरीक्षक सुरज काळे हे होते या वेळी नागरिकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मास्क व सॅनिटायजर वाटप करण्यात आले तसेच आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यासाठी किटचे वाटप करण्यात आले या वेळी कृ.उ.बाजार समिती चे सभापती संतोष मापारी,माजी सभापती विजू काका मापारी,माजी शहरप्रमुख अशोक वारे,डॉ फिरोज शहा,डॉ निखील अग्रवाल,देशमुख,डॉ दयानंद ओव्हर. आदी मान्यवर उपस्थित होते सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिवसेना शहरप्रमुख पांडुरंग सरकटे,शिवसेना कामगारसेल चे शहर प्रमुख सागर सिरसाट,विद्युत ठेकेदार रवी जावळे यांनी अथक परिश्रम घेतले.
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहावे - नंदकिशोर मापारी..
लोणार प्रतिनिधी:- संदीप मापारी पाटील.
