सांगवी येथे माता समिती बैठक आहार मार्गदर्शन पाककृती प्रात्यक्षिक ,प्रदर्शन व आरोग्य कार्यशाळा कार्यक्रम सपंन्न...


 सांगवी प्रतिनिधी: - 

पंचायंत समिती फलटण   बिट सोमथंळी यांच्या माध्यमातून बिटस्तरीय माता समिती बैठक  आहार मार्गदर्शन पाककृती प्रात्यक्षिक प्रदर्शन व आरोग्य  कार्यशाळा या कार्यक्रमाचे उदघाटन सांगवी गावचे सरपंच संतोष ( सनी )  मोरे यांच्या हस्ते करण्यात आले   या कार्यक्रमामध्ये फलटण तालुक्यात सांगवी येथे प्रथमच   वृक्ष देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले  प्रथमता सांगवी गावचे सरपंच , ग्रामविकास अधिकारी रणवरे  व  ग्रामपंचायत सदस्य यांनी  सर्व  प्रदर्शनाची पाहणी केली   या कार्यक्रमामध्ये सर्वांना उपयुक्त असे भाजी पाला डाळी, तसेच फळे या बद्दल  माहीती होईल असे सर्व माहीती येथे पाहयाला मिळाली  पंचायत समिती  फलटण   दहा टक्के सेस महिला व बाल विकास  विभाग अंतर्गत माता समिती  बैठक आहार  प्रदर्शन पाककृती प्रात्यक्षिक व आरोग्य कार्यशाळा या कार्यक्रमाचे आयोजन बीट सोंमथळी  अंतर्गत ग्रामपंचायत सांगवी येथे केले कार्यक्रमामध्ये  आहार प्रदर्शनामध्ये  विविध पाककृती तयार करून माडल्या होत्या सोबत पाककृती बनविन्याची पध्दती लिहून मांडल्या होत्या यामध्ये शेवगा पाककृती वर विशेष भर दिला  शेवग्यापासून विविध प्रकारच्या दहा पाककृती तयार केल्या होत्या कार्यक्रमाचा एकूण उद्देश अॅनिमिया मुक्त भारत हा असून सोमथंळी उपकेंद्रांच्या डाॅ. पाटील मॅडम यांनी सर्वांना समजेल अशा भाषेत व सर्व समावेश करूण सखोल मार्गदर्शन महिलांना केले तसेच कार्यक्रमामध्ये बाल विकास प्रकल्प अधिकारी श्री कोळेकर यांनी बाळाचे पहीले एक हजार दिवस यावर मार्गदर्शन केले कार्यक्रमावेळी फलटण पंचायंत समिती च्या उपसभापती सौ रेखा खरात उपस्थित होत्या त्यांनीही महीलांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रास्तविक सुत्रसंचालन  सोमथंळी बीट च्या पर्यवेक्षीका कोमल फुले/ ताम्हाणे यांनी केले त्या वेळी उपस्थित फलटण पंचायत समिती उपसभापती, केंद्रप्रमुख रणवरे, सांगवी गावचे सरपंच उपसरपंच  सह सदस्य सह ग्रामंस्थ व  सांगवी जिल्हा परिषद   शिक्षक येळे  व ग्रांमपंचायत सांगवीचे ग्रामविकास अधिकारी  ए. एच .रणवरे उपस्थित होते.

Previous Post Next Post