रात्रीच्या वेळेस भरधाव रेतीची वाहतूक करणाऱ्यावर कडक कारवाई करणार - पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख...

लोणार ता.प्रतिनिधी: -  संदीप मापारी पाटील   

रात्रीच्या वेळेस भरधाव रेतीची वाहतूक करणाऱ्यावर कडक कारवाई करत गुन्हे दाखल करण्याचा इशारा लोणार पो.स्टे चे कर्तव्यदक्ष वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी दिला आहे .रात्रीच्या वेळेस रेतीची भरधाव वेगाने वाहतूक करणाऱ्या टिप्पर चालकावर कारवाई करत गुन्हे दाखल केले आहे दि १५ मार्च २०२१ रोजी सायंकाळी ६:१५ वाजता रेतीचे टिप्पर क्रमांक MH 28 AB 9754 चालक आरोपी अंकुश हरी चव्हाण हा शहरातील विनायक चौकात रहदारीचे नियमाकडे दुर्लक्ष करून हलगर्जीपणाने भरधाव वेगाने नागरिकाच्या जीवाला धोका निर्माण होईल असे टिप्पर चालवत जोरात हॉर्न वाजवत जात असताना सबंधित पोलीस कर्मचाऱ्यानि याला थांबण्यास हात दिला असता न थांबता सदर टिप्पर चालक भरधाव वेगाने टिप्पर चालवत होता या घटनेची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना मिळताच यांनी तात्काळ आपले सहकारी पोलीस उपनिरीक्षक सुरज काळे,पोलीस उपनिरीक्षक भारत बरडे लेखनिक चंद्रशेखर मुरडकर,पो.कॉ किशोर बोरे,यांना सदर टिप्पर चा पाठलाग करत कारवाई च्या सुचना दिल्या सदर टिप्पर हा पाठलाग करत पो.स्टे ला जमा करत टिप्पर चालकावर ६६/२०२१ कलम २७९ भादवी सह कलम मोटर वाहन कायदा २१(४) १७७.२१(५)/१७७.११९/१७७,१३०(१)/१७७.१८४प्रमाणे गुन्हा दाखल केला असून रात्री रेतीची भरधाव वाहतूक करणाऱ्या कडक कारवाई करत गुन्हे दाखल करण्याचा इशारा लोणार पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी दिला असून या इशाऱ्यामुळे रात्री रेतीची वाहतूक करणाऱ्या रेती माफियांचे धाबे दणाणले आहे.

 

Previous Post Next Post