धारणी पोलिसांची कौतुकास्पद कारवाई.मुबईतून आरोपीला घेतले ताब्यात...


 राजु भास्करे:-अमरावती जिल्हा प्रतिनिधी 

धारणी शहरातील अल्पवाईल मुलीला घेऊन पळालेल्या अलीखान हसमखाण याला धारणी पोलिसांनी मुबईतील बांद्रा स्थित लालमट्टी नामक झोपडपट्टी परिसरातून तांत्रिक पद्धतीने जे्रबंद केले आहे. धारणीने ठाणेदार विलास कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून पो कॉ. शरद माहुलकर व प्रवीण बोट यांनी मुंबईतील बांद्रा परिसरातील लालमाट्टी दाट झोपडपट्टीतून आरोपी अलीखान हासमखान सह अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले.व सुरक्षितपने दोघांनाही ताब्यात घेऊन धारणीला परत आणले. व आरोपी हासमखान विरुद्ध 373 नुसार गुन्हा कायम करण्यात आला.पोलीस अधीक्षक हरिबालाजी यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि विलास कुलकर्णी यांच्या नियाजनाखाली पो. कॉ. शरदमाहुलकर व प्रवीण बोट यांनी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून यशस्वीपणे तपास करून आरोपीला जे्रबंद करून मुलीला आईवडिलांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्यामुळे धारणी पोलिसांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

Previous Post Next Post