कोविड मुळे धारणीचा होळीचा बाजार बंद...


 राजु भास्करे:-अमरावती जिल्हा प्रतिनिधी 

कोरोनाच्या वाढता  प्रादुर्भाव लक्षात घेता धारणी शहरामध्ये कोरोना प्रतिबंधक उपायsयीजना म्हणून शुक्रवारी भरणारा धारणी येथील आठवडी बाजार पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय नगरपंचायत धारणी यांनी घेतला आहे. व तश्याप्रकारच्या सूचना ही सर्वाना देण्यात आल्या आहेत.दिवसेंदिवस कोरोना आता मेळघाट मधेही मोठ्या प्रमाणात पाय पसरवत असताना त्याला प्रतिबंध घालण्यासाठी धारणी नगरपंचायत ने नियमामध्ये कठोर बंधने घातली आहेत.दुकाणे आस्थापना सकाळी नऊ ते पाच वाजेपर्यंत सुरु ठेवावे. नंतर सुरु ठेवणाऱ्या दुकानदारावर कठोर कार्यवाही करण्यात येईल. तसेच शुक्रवार चे धारणी ला भरणाऱ्या आठवडी बाजार बंद राहणार आहे.होळी हा आदिवासी बांधवांचा सर्वात मोठा व महत्वाचा सन असून त्यासाठी वर्षभरापासून आतुरतेने वाट पाहतात. धारणी ही मेळघाट ची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. तसेच मेळघाट ची आर्थिक राजधानी आहे. व होळी च्या बाजारामध्ये धारणीत करोडोची उलाढाल होत असते. आणि याच एवढ्या मोठ्या बाजाराच्या दिवशी कोरोनामुळे धारणी आठवडी बाजार बंद राहणार हे एकूण खेड्यापाड्यातील आदिवासी बांधव निराश झाले आहेत .शुक्रवारी धारणी शहरांत जड वाहनास प्रवेश प्रवेश बंद करण्यात आला आहे. तसेच सर्व प्रवाशी वाहनांवर बंदी घालण्यात आली आहे.

Previous Post Next Post