शेगावात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनीनी साजरा केला चिमणी दिवस..


 शेगाव ता.प्रतिनिधी:-

महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या संत नगरी शेगाव शहरात महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या मुलींनी जागतिक चिमणी दिवस 21 मार्च रोजी साजरा केला.. चिमणी पाखरं निसर्गाची ईश्वराने दिलेली देणगी आपल्या भारतीय संस्कृती मध्ये पक्ष्यांना अतिशय महत्वपूर्ण स्थान देण्यात आलेले आह गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात काँक्रिटीकरण झालेले आहे व त्याकरिता बेसुमारपने वृक्षांची कत्तल सुरू आहे त्यामुळे पक्ष्यां चे अस्तित्वच धोक्यात आलेले आहे पर्यावरणाचा समतोल राखण्यात पशु पक्षी महत्त्वपूर्ण घटक समजले जातात त्यामुळेच विलुप्त होत असलेल्या पक्ष्यांचे चिमणी पाखरांचे संरक्षण करण्याची जबाबदारी प्रत्येकाने उचलणे गरजेचे आहे जागतिक चिमणी दिवस यानिमित्त शेगाव येथील बीएससी फायनल इयर मध्ये शिक्षण घेत असलेल्या कुमारी रक्षा भगवान भारंबे पाटील इयत्ता बारावी मध्ये शिक्षण घेत असलेली कुमारी रेणुका अरविंद तायडे कुमारी कुसुम रितेश चव्हाण या मुलींनी शेगाव शहरात अनेक झाडावर तसेच घराच्या छतावर पक्ष्यांसाठी चिमणीसाठी दाना आणि पाणी या करिता भांडे व पात्रे ठेवले आणि नागरिकांनाही पक्षी वाचविण्याचा संकल्प घेण्याचे आवाहन केले.

Previous Post Next Post