बोर्डी च्या विद्यार्थिनीची परीक्षा पे चर्चा याविषयावर परीसंवादकरीता निवड...


 अडगाव बु!प्रतीनिधी:- पुरुषोत्तम निमकडेॅ

बोर्डी येथील मध्यम कुटुंबातील  व श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय, आकोटची वर्ग ११ ची विद्यार्थीनी कु.रूपाली संजय गुरेकार हिची मिनिस्ट्री ऑफ एज्यूकेशन , गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मार्फत आयोजीत ' परीक्षापे चर्चा ' ह्या विषयावर आयोजीत परिसंवादात माननीय प्रधानमंत्री महोदयांशी प्रत्यक्ष चर्चा करण्याकरिता निवड झाली आहे.त्याअनुषंगाने तिचे व्हिडिओ शुटिंग करण्याकरिता दिल्लीच्या कॅमेरामनची टीम शासकीय कमेरामन श्री बिपीनकुमार व विशाल जयस्वाल आज दि.१९.३.२०२१ ला आकोटला दाखल झाली व चित्रीकरण शिवाजी कनिष्ठ महावीद्धालय अंजनगाव रोड अकोट येथे संपन्न झाले.लवकरच DD-1 वर सर्वांना हा परिसंवाद  पाहता येईल. कु.रूपाली गूरेकारच्या ह्या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.केंद्रीय मंत्री मा.ना.संजयजी धोत्रे.यांनी सुद्धा फोनवरुन तिला शुभेच्छा दिल्या.महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती धुळे , उपप्राचार्य श्री.अतुल म्हैसने ,पर्यवेक्षकव्दय श्री.सावरकर , संजय वालशींगे सर,अंजलीताई गावंडे ,रश्मीताई गावंडे शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारीवृंद .तसेच बोर्डी वासी माजी जी.प.सदस्य बालासाहेब बोंद्रे,जि.प।सदस्य गजाननराव डाफे,जी.प.सदस्य प्रकासजी आतकड उपसरपंच राजेश भालतीलक,माजी सरपंच संजय ताडे,पत्रकार नरेंंन्द्र कोंडे.ग्रा.पं.सदस्य मो.साजीद कपील रजाने ,शाम लटकुटे जि.प.शाला मुख्याध्यापक चोरे सर,तसेच विवीध पक्षाचे राजकीय नेते,सामाजीक कार्यकर्ते यांच्याकडून सर्वत्र रूपालीचे अभिनंदन करुन तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा देत आहेत.

Previous Post Next Post