जनतेला नियम शिकवणाऱ्या नगरपरिषद पथकाला अखेर नगरपरिषदेनेच केला ५०० रुपयाचा दंड...


जळगांव जा.प्रतिनिधी:-अनिल भगत.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सध्या सर्वत्र जिल्हा प्रशासनाने साथरोग कायद्याअंतर्गत कडक निर्बंध लागू केले आहेत त्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी म्हणून स्थानिक नगर परिषदेमध्ये एक पथक निर्माण केले आहे. परंतु या पथकात समाविष्ट कर्मचारीच काळात निर्बंध पाळत नसल्याचे लक्षात आल्यावर व्यापारी संघटना अध्यक्ष अजय वानखडे यांनी नगरपालिकेच्या फिरत्या पथकाला दंड भरण्यास बाध्य केले दिनांक 11 मार्च रोजी सायंकाळी पथकातील कर्मचारी एकाच गाडीत सात जण बसून शहरात फिरत होते ह्या गाडीत गेल्या काही दिवसांपासून नगर परिषदेचे कर्मचारी आठ दहा जण बसून फिरत होते दिनांक 11 मार्च रोजी या गाडीमध्ये सात जण असल्याचे अजय वानखडे यांच्या निदर्शनास आले असता याबाबत व्यापारी संघटनेचे सचिव चतुर्भुज केला व व्यापारी संघटना पदाधिकारी यांनी नगरपरिषदेचे काकड यांना विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली याबाबत जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार तसे जळगाव जामोद तहसीलदार यांना कळविण्यात आले परंतु दंड करण्यास त्यांनी असमर्थता दाखविली शेवटी शहरातील व्यापारी व नागरिक मोठ्या संख्येने पोलिस स्टेशनमध्ये गोळा झाले निर्माण झालेल्या दबावामुळे अखेर पाचशे रुपये दंडाची पावती नगर परिषदेने फाडली नगरपालिकेकडून नगरपालिकेला दंड होण्याची ही आगळी वेगळी घटना जळगाव जामोद येथे घडली आहे सदर पथकाची गाडी पोलीस स्टेशन मध्ये आणून त्यांच्याकडून पाचशे रुपये दंड वसूल करण्यात आला याबाबत अधिक माहितीसाठी जळगाव जामोद नगर परिषदेला कायमस्वरूपी सीईओ नाही व कार्यालय प्रमुख काकड यांचे भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क केला असता मी मीटिंग मध्ये आहे नंतर कॉल करा असे सांगितले त्यानंतर पाहून तासांनी फोन लावला असता रिसीव केला नाही हे विशेष.

Previous Post Next Post