अमरावती जिल्हा प्रतिनिधी:-राजु भास्करे.
12 मार्च रोजी रात्री धारणी पोलीसांनी मध्यरात्री बासपाणी फाट्यावर 39 किलो 501700 किंमतीच्या गांज्यासह पाच आरोपीना ताब्यात घेतले आहे. धारणी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार धारणी चे ठाणेदार विलास कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी बासपाणी फाट्यावर सापळा रचून मध्यरात्री केलेल्या कारवाहीत 4 गांजा तस्करा सह 1विधिसंघर्ष बालकास अमली पदार्थ गांजा वनस्पती ची वाहतूक करतांना ताब्यात घेतले आहे.त्यांचेकडून 39 किलो 170 ग्राम गांजा किंमत 391000 सह वाहतुकीकारिता वापरण्यात येणाऱ्या 2 दुचाकी किंमत 1 लाख 3 मोबाईल हँडसेट किंमत 10000 रु असा एकूण 501700 ₹ चा एवज त्यांचे कडून जप्त करण्यात आला आहे. ताब्यात घेण्यात आलेले आरोपीचे नाव.1)शेख शहीद शेख शफी वय 25,रा. मालेगाव जि. नाशिक, 2)मो. नसीम शेख यासिन वय 48 राहणार नेहरू नगर धारणी,3)अब्दुल कुडतुस अब्दुल राउफ वय 19 राहणार दुबई मोहल्ला धारणी,4)शेख आबीद अब्दुल राउफ रा. दुबई मोहल्ला धारणी,व एका विधिसंघर्ष बाल्कविरुद्ध NPDS अंतर्गत गुंन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर कार्यवाही ही मा. पोलीस अधीक्षक अमरावती, उपविभागीय पोलीस अधिकारी धारणी यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार विलास कुलकर्णी व डीबिपथकाचे उप पो निरीक्षक मंगेश भोयर,नपोका प्रकाश गिरडकर, नपोका प्रवीण बोन्डे, पोक राम सोळंकी मोहित आकाशे, अनुराग पाल सहभागी होते.