जिल्हा परिषदेच्या रिक्त झालेल्या बांधकाम व शिक्षण समितीच्या सभापती पदी मंगरूळ दस्तगीर सर्कलचे सदस्य सुरेश निमकर यांची शनिवारी अविरोध निवड करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित विशेष सभेला ५६ पैकी ३४ सदस्यांनी उपस्थिती दर्शविली.या निवडणुकीत भाजपने माघार घेतल्यामुळे सभेला देखील एकही सदस्य उपस्थित नोव्हता.प्रियंका दगडकर यांच्या आकस्मीत निधनामुळे जिल्हा परिषदेमध्ये बांधकाम व शिक्षण समितीचे सभापती पद रिक्त झाले होते.या रिक्त जागेवर निवडणुक विभागाने शनिवारी निवडणुक लावली. अमरावतीचे उपविभागीय अधिकारी उदय राजपुत यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणुक पार पडली. सकाळी ११ ते दुपारी २ वाजे पर्यंत नामांकन अर्जाची उचल आणि दाखल करण्याकरिता वेळ देण्यात आली होती. परंतु या जागेकरिता सुरेश निमकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. दुपारी ३ वाजता सभेला सुरूवात करण्यात आली. सभापती पदाकरिता एकच अर्ज प्राप्त झाल्याने निमकर यांच्या नावाची घोषणा यावेळी करण्यात आली.सभेला सीईओ अमोल येडगे, प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय रहाटे, नायब तहसिलदार प्रविण देशमुख, प्रमोद देशमुख व विजय शेलुकार यांच्यासह सभागृहात अध्यक्ष बबलू देशमुख, उपाध्यक्ष विठ्ठल चव्हान, सभापती बाळासाहेब हींगणीकर पुजा आमले,दयाराम काळे यांच्या ३४ सदस्य व पंचायत समितीचे चार सभापती उपस्थित होते.मात्र सुरूवातीपासुनच निरूत्सह असलेल्या भाजपचा एकही सदस्य सभागृहात उपस्थित नोव्हता.
प्रतिक्रिया:-
भाजपा काही सदस्यांचा बाहेरूनच पांठिबा
सभापती पदाच्या निवडणुकीकरिता काँग्रसने अध्यक्ष बबलु देशमुख यांच्या शासकीय निवासस्थानी शनिवारी सकाळी ११ वाजताच काँग्रेस सदस्यांची बैठक बोलाविली होती. या बैठकीला काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सदस्यांसह युवा स्वाभिमान,बसपा व भाजपाच्या देखील काही सदस्यांची उपस्थित होती. त्यामुळे त्यांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरली. त्यांनी बाहेरूनच आपला पांठिबा देत सभागृहात मात्र अनुपस्थिती दर्शविली.
प्रतिक्रिया:-
उमेदवारी करिता कोणी तयार नव्हते
गटनेता म्हणुन मी सर्वांनाच उमेदवारी दाखल करण्याकरिता सांगितले होते. परंतु कोणीही उमेदवारी इच्छुक नसल्याने आता सत्ताधाऱ्यांचेच बहुमत असल्याने आम्ही निवडणुकीमधुन माघार घेतली.प्रविण तायडे, गटनेता भाजप
