धारणी तालुक्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना अंतर्गत कार्यरत ग्रामरोजगार सेवकाना बरेच दीवसापासून मानधन न मिळाल्याने व होळीचा सण जवळ आल्याने होळीपूर्वी रोजगार सेवकांचे मानधन अदा करण्यात यावे, यासाठी ग्रामरोजगार सेवकांनी तहसीलदार यांना निवेदन दिले आहे.होळी हा मेळघाट मधील आदिवासी बांधवांचा सर्वात मिठा सण असल्याने मजुरांना वेळेवर मजूर मिळावी यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न केले जातात. परंतु ज्या मजुरांना वेळेवर काम व कामाचे सर्व नियोजन हजेरी घेणे मस्टर भरणे इत्यादी सर्व कामे ग्रामरोजगार सेवक मार्फत केले जातात. परंतु एवढे कामे करूनही रोजगार सेवकांना वेळेवर मानधन दिले जात नाही.होळी हा सर्वात मोठा सण असल्याने होळी सन साजरा करण्यासाठी व मुलाबाळासाठी कपडे व खाऊ साठी होळीपूर्वी मानधन मिळावे या साठी दाहरणी तालुक्यातील ग्रामरोजगार सेवकांनी तहसीलदारणा निवेदन देऊन मागणी केली आहे.निवेदन देताना,गजानन मानके, (अध्यक्ष रोजगार सेवक संघटना),राजेश जावरकर,सुदाम पाटोरकर,हिरालाल पाटणकर,रामकिसन बारवांन,रामदास सावलकर,उमाकांत तांडील, कल्पेश पटोरकर, भुरेलाल धांडे, सोहन कासदेकर, निलेश मालवीय.
रोजगार सेवकांचे मानधनसाठी तहसीलसीदारांना निवेदन...
राजु भास्करे:-अमरावती जिल्हा प्रतिनिधी
