नेहरू केंद्राच्यावतीने कोरोना संदर्भात जळगांव जामोद बस स्थानकावर जनजागृती अभियान...


 जळगांव जा.प्रतिनिधी:-अनिल भगत.

बुलढाणा जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा भडका उडाला आहे.दररोज बाधितांचा आकडा वाढत आहे. प्रशासन शर्थीचे प्रयत्न करीत असून उपाय योजना राबविण्यात येत आहे.लोकांमध्ये कोरूना बाबत जनजागृतीसाठी नेहरू युवा केंद्र बुलढाणा व स्थानिक अरुणोदय बहुउद्देशीय संस्था यांच्यामार्फत स्थानिक जळगाव जामोद बस स्टॅन्ड च्या आवाजामध्ये पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली.सर्वसामान्य नागरिकांना पूर्ण नियमांचे पालन करण्यासंदर्भात माहिती तसेच संसर्गा पासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी कोणती सावधगिरी बाळगावी यासंबंधी जनजागृती करण्यात आली व अनेक बाबिंवर पथनाट्यातून प्रकाश टाकण्यात आला सदर पथनाट्य मध्ये  शाहीर गणेश कदम, शाहीर आसुबा हिवाळे, शाहीर दगडू जाधव, लोककलावंत समाधान गायकवाड, शाहीर दिनकर मस्के, सहा कलावंत मिथुन गवळी यांनी काम केले. तसेच सूत्रसंचालन अंकिता हीस्सल संयोजीका नेहरू युवा केंद्र जळगाव जामोद व आभार प्रदर्शन विजय वाकोडे संयोजक नेहरू युवा केंद्र जळगाव जामोद यांनी केले तसेच सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रमोद येऊल प्रतीक राऊत व अरुणोदय बहुद्देशीय संस्था जळगाव जामोद यांनी काम पाहिले

Previous Post Next Post