अमरावती जिल्हा प्रतिनिधी :-राजु भास्करे.
टेरे पॉलिसी सेन्टर पुणे मार्फत "फॉरेस्ट क्वीन" या पुरस्काराने सन्मान..जगभरात जागतिक महिला दिवस 8 मार्च रोजी साजरा केला जातो. या निमित्ताने जगभरात, आपल्या देशात विविध संस्था संघटना हा दिवस उत्साहाने साजरा करतात. युनायटेड नेशन एन्व्हर्नमेंट प्रोग्राम(UNEP) मेंबर डॉ राजेंद्र शेंडे हे महाराष्ट्रातील टेरे पॉलिसी सेंटर पुणे या संस्थेचे चेअरमन आहेत. पर्यावरण अभ्यासक डॉ विनिता आपटे पुणे या संस्थेच्या डायरेक्टर आहेत. या संस्थे मार्फ़त महिला सक्षमीकरण या विषयात काम केले जाते. रोजगार निर्मिती, महिला विषयक कायदे, पॉलिसी याबाबत काम केले जाते. जागतिक महिला दिवसाचे निमित्ताने या जंगल संवर्धन साठी विशेष योगदान देणाऱ्या 6 युवा महिलांना फॉरेस्ट क्वीन या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.या मध्ये मेळघाटातील गिता बेलपत्रे यांना हा सन्मान मिळाला आहे. मेळघाटात विविध संस्था बरोबर मागील 10 वर्षा पासून काम करत आहेत. यामध्ये महिला आर्थिक विकास महामंडळ, महाराष्ट्र दुष्काळ मुक्ती साठी काम करणारे पाणी फौंडेशन या सारख्या विविध संस्था बरोबर त्यांनी काम केले आहे. सध्या निसर्गा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल ऍक्शन, रीसर्च, गाईडन्स अँड असेसमेंट या संस्थे मध्ये कार्यक्रम समनव्यक म्हणून कार्यरत आहेत. ही संस्था मेळघाट टायगर रिझर्व्ह तथा मेळघाट प्रादेशिक वन विभाग बरोबर माहिती व जनजागृती सहयोगी म्हणून अंगार मुक्त जंगल स्पर्धा अभियान मेळघाट राबवत आहेत. अंगार मुक्त जंगला साठी लोकसहभाग वाढवा तसेच वन विभाग, टायगर प्रोजेक्ट आणि मेळघाटातील जनता यांचे मध्ये समन्वय सहयोग व्हावा हा उद्देश घेऊन अंगार मुक्त जंगल अभियान सुरू झाले. मेळघाटातील जंगलाला आगी लागण्यास कारणीभूत चुकीच्या पद्धती म्हणजे शेतातील काडी कचरा जाळणे, धुरे जाळणे, मोह फुलं, तेंदूपत्ता जमा करण्यासाठी आगी लावणे. तसेच गावागावात आगी पासून वन्यप्राणी, नैसर्गिक साधन संपत्ती चे होणारे नुकसान या बाबत जाणीव निर्माण 300+ गावापर्यंत पोहचवत आहे. स्थानिक 7 युवकांना सोबत घेऊन हे अंगार मुक्त जंगल अभियान मेळघाट टायगर रिझर्व्ह स्थापना दिवस 22 फेब्रुवारी पासून ते जुलै महिन्यातील वन महोत्सव ला सांगता होणार आहे.. अंगार मुक्त राहिलेल्या विशेष गावांना सन्मानित करण्यात येणार आहे. फॉरेस्ट क्वीन या पुरस्कारासाठी युवा महिला फॉरेस्ट गार्ड राणी गरुड यांना सुद्धा हा सन्मान मिळाला आहे. बुलमगव्हान या धारणी वन परिक्षेत्र अंतर्गत असलेल्या गावात 2 वर्षा पासून कार्यरत आहेत. 8 मार्च ला झालेल्या ऑनलाईन कार्यक्रमात त्यांनी आपल्या कामाचे अनुभव कथन केले. "वनांचे आगीपासून संरक्षन करतांना रात्री बेरात्री फिल्ड वर जावे लागते. त्यामुळे लोकांना अंगार मुक्त जंगला साठी प्रेरित करणे हे महत्वच आहे..मोह फुले वेचण्या करिता आग न लावता वेचण्या करिता स्वतः लोकांसोबत खराटा हाती घेऊन मोहाच्या झाडाखाली झाडू घेऊन सफाई केली. मेळघाट भवाई पूजेला घरोघरी बांम्बु पूजन होते. त्या करिता वना मधून बांबू तोडून आणला जातो. त्या करीता पूजेच्या दिवशी बांबू रोपांचे वाटप करून त्याचे रोपन भवाई पूजेला केले." असे मेळघाटातील अनुभव ऑनलाईन झूम मीटिंग कार्यक्रमात उपस्थित असलेल्या लोकांना मिळाले. प्रणाली चव्हान डेप्युटी डायरेक्टर ऑफ ऍग्रीकल्चर, प्रिया वरेकर - संशोधक- कान्हा टायगर रिझर्व्ह, फॉरेस्ट गार्ड स्मृती उपाध्याय बंधावगड टायगर रिझर्व्ह, फॉरेस्ट गार्ड लक्ष्मी मेरावी कान्हा टायगर रिझर्व्ह यांना सुद्धा फॉरेस्ट क्वीन हा सन्मान मिळाला आहे.