भरधाव वेगात जाणारे रेतीचे टिप्पर उलटले चालक जखमी


 लोणार ता.प्रतिनिधी:-संदिप मापारी पाटील.

लोणार बुलढाणा भरधाव वेगात जास्तीत जास्त रेतीच्या फेऱ्या व्हाव्या या उददेशाने अनेक रेती वाहने शेंगाव ते पंढरपुर राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगाने वाहत असतात असाच अपघात दि 11 मार्च20201 रोजी दुपारी 4 वाजेच्या दरम्यान लोणार ते मंठा रस्त्यावरील बायपास रोडवर असलेल्या अर्थव हॉटेल समोर असलेल्या वळणावर रेतीने भरलेले टिप्पर उलटल्याची घटना घडली सुदैवाने समोरून कोणतेच वाहन वा पादचारी नसल्याने मोठा अनर्थ टळला.याबाबत सविस्तर वृत्त असे की,मराठवाडयातील पुर्णा नदीपात्रातील वाळु उपसा सुरू झाल्याने रेतीघाटातुन तसेच रेतीघाटाकडे जाणारे रेतीवाहतुक संख्येत मेाठया प्रमाणात वाढ झाली असे असताना आपल्या वाहनाच्या दिवसभरात जास्तीत जास्त रेती फेऱ्या व्हाव्या या उददेशाने हे रेतीवाहन चालक निष्काळजीपणे भरधाव वेगाने आपले वाहन चालवित असल्याचे दिसुन येत आहे याचे उदाहरण 11 मार्च 2021 रोजी घडले रेती घाटातुन भरधाव वेगाने येणारे 10 टायर टिप्पर क्रं एम एच 28 एबी 4888 नुकतेच पासींग झालेले व नंबर सुध्दा चुन्याने टाकलेले टिप्पर दुपारी 4 वाजेच्या दरम्यान भरधाव वेगाने येत मंठा नाक्याजवळ असलेल्या वळणावर पलटी झाले यामधील ड्रायव्हर व आत मध्ये असलेले दोन व्यक्ती काचा फुटुन बाहेर पडत टिप्पर पलटी झाले यामध्ये चालक जखमी झाला असुन या टिप्पर मध्ये तळणी वरून लोणार येथे येणारा एक प्रवासी सुध्दा जखमी झाला या टिप्परच वेग भयानक होता त्यामुळे टिप्पर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने टिप्पर पलटी झाले मागील महीन्यापासुन वायुवेगाशी स्पर्धा करीत रेती टिप्पर चालक बेभानपणे शहरातुन रात्रदिवस रेती वाहतुक करत आहे.यामध्ये महसुल विभागाचा तपासणी नाका आहे महसुल प्रशासन त्याचे काम चोखपणे बजावत आहे मात्र ज्या भागातुन सदर रेती वाहतुक बरणारे बेभान बेकरदरपणे चालणारे टिप्पर याला संबधीत प्रशासन यांचाकडुन अभय मिळत आहे  करणारे  प्रशासन रेती माफीयावर का मेहेरबानी करताना दिसत तर नाही ना टिप्पर चालाकावर कारवाई का करत नाही हा प्रश्न सामान्य नागरिक उपस्थीत करीत आहे.भरधाव वेगाने रेती वाहतुक करणाऱ्यावर कारवाई होणे गरजेचे असताना सुध्दा  प्रशासनाकडुन कारवाई होत नसल्यामुळे याला कोण जबाबदार महसूल .पोलीस .का R T O . सर्वसामन्य नागरिकामध्ये  प्रशासनाविरोधात रोष निर्माण झालेला आहे.या घटनेत जखमी झालेल्या चालकास उपचारासाठी खाजगी रूग्नालयात घेउन गेले असुन वृत्त लिहेपर्यत घटनास्थळी  प्रशासकीय यंत्रणा पोहचले नाही.

Previous Post Next Post