राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चौधरींचा थेट आरोग्य मंत्री राजेश टोपेंना फोन आणि सोमवार पासुन होणार वरणगावात लसीकरणाला सुरुवात..


 वरणगाव प्रतिनिधी - सुनील पाचपोळ  

वरणगाव येथे गेल्या काहि दिवसांपुर्वी वरणगाव ग्रामीण रुग्णालयात कोविड- १९ प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात व्हावी यासाठी वरणगाव राष्ट्रवादीने महाविकास आघाडी च्या संयुक्त विद्यमाने निवेदन देऊन जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याशी चर्चा केली होती तरी आश्वासन पुर्ताता होत नसल्याने व शहरातील नागरीकांना लसीकरणासाठी नाहक त्रास सहन करुन खेड्यापाड्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रावर जाऊन लसीकरण करावे लागत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपजिल्हाध्यक्ष राजेंद्र विश्वनाथ चौधरी यांनी तत्काळ आरोग्य मंत्री ना.राजेश टोपेंना व पालकमंत्री ना.गुलाबराव पाटिल यांना दूरध्वनीवरून संवाद साधल्यानंतर मंत्री महोदयांनी तत्काळ जिल्हा शल्यचिकित्सक यांना आदेश करुन सोमवारपासून वरणगाव ग्रामीण रुग्णालयात कोविड- १९ प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात करण्याचे आदेश दिल्याने आरोग्य यंत्रणा तत्काळ कामाला लागली असुुन मुबलक प्रमाणात लस उपलब्ध व्हावी याकरीता यंंत्रणा धावपळ करत आहे .सोमवारपासून सुरु होणाऱ्या लसीकरणाला जास्तीत जास्त जेष्ठ नागरीकांनी प्रतिसाद दयावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतिने करण्यात येत आहे.वरणगाव ग्रामीण रुग्णालयात निवेदन देते वेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपजिल्हाध्यक्ष राजेंद्र विश्वनाथ चौधरी, तालुकाध्यक्ष दिपक मराठे, युवक जिल्हाउपाध्यक्ष वाय.आर.पाटील सर, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष मनोज कोलते, मा.नगरसेवक साजिद कुरेशी, पप्पुभाई जकातदार, कैलास माळी, ईफ्तेखार मिर्झा, विलासराव मुळे, कौस्तुभ पाटील आदी उपस्थित होते

Previous Post Next Post