जळगांव जामोद तालुक्यात ठिकठिकाणी विद्युत पोलवरील तार खाली लोंबकळत आहेत. त्या लोबकळत असलेल्या तार काढुन त्याजागी एरीअर बंद केबल टाकण्यात यावे.तसेच तालुक्यामध्ये ह्या लोंबकळत असणाऱ्या विद्युत तारांमुळे कित्येक नागरिक तसेच जनावरांना आपला जीव तसेच आर्थिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच काही ठिकाणचे विद्युत पोल खराब झाले आहेत. त्यामुळे सुध्दा जीवित हानी होउ शकते.तसेच तालुक्यातील च सातळी येथे बस स्थानकाजळ पोल खुप खराब झाला आहे. त्या विद्युत पोलमुळे शॉक लागल्याने एक कुटुंब मरता मरता वाचले आहे. त्यामुळे महावितरण विभाग जळगांव जामोदने ताबडतोब खराब पोल काढुन नवीन पोल टाकुन त्यावर तारांएवजी एरीअर बंद केबल टाकावा या मागणीसाठी दिनांक १२ मार्च रोजी जळगांव जामोद येथील महावितरण विभागाला देण्यात आले निवेदन. निवेदनावर अक्षय दामोधर पाटील,विशाल पाटील,संकेत रहाटे,युवराज देशमुख,विनायक भालतडक,दिपक बावस्कर यांच्यासह बहुसंख्य नागरीकांच्या सह्या आहेत.
लोंबकळत असलेल्या विद्युत तारा काढुन एरीअर बंद केबल टाकावे या मागणीसाठी देण्यात आले निवेदन...
जळगांव जा.प्रतिनिधी:-अनिल भगत.