उत्तर प्रदेशातील माजी वक्फ बोर्ड अध्यक्ष वसिम रिझवि यांनी मुस्लिम धर्माचे पवित्र कुराण मधील २६ आयात वगळण्या संबंधी सुप्रिम कोर्टमध्ये याचिका दाखल केली यामुळे संपुर्ण मुस्लिम बांधवांच्या भावना दुखावल्या अशा माथेफिरू ने केलेल्या क्रुत्याचा निषेध म्हणून जळगाव जामोद समाजवादी पार्टीच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले व स्थानिक पोलीस स्टेशन जळगाव जामोद यांना सुद्धा निवेदन देऊन संबंधित माथेफिरुवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे,या निवेदनावर उल्मा ए इकराम चे मौलवी खलिल,मुफ्ती माजिद, हाफिज वकिल,व समाजवादी पक्षाचे शहराध्यक्ष सैय्यद नफिस, जिल्हा अध्यक्ष अजहर खान, जिल्हा महासचिव लियाकत खान तालुका अध्यक्ष मुश्ताक जमदार, रिजवान खान, डॉक्टर जावेद, सैय्यद कमर,अस्लम मौलाना, इरफान मौलाना यांच्यासह समाजवादी चे पदाधिकारी व उल्मा इकराम उपस्थित होते.
वादग्रस्त वसीम रिजवी यांचा समाजवादी कडून निषेध...
जळगाव जामोद प्रतिनिधी:-
