कोरोना काळातील वीजबिल माफी साठी स्वाभिमानीचे रास्ता रोको आंदोलन संपन्न...


 जळगाव (जामोद) प्रतिनिधी:-अनिल भगत.

दिनांक १९ मार्च सध्या शेतकऱ्यांची स्थिती फार बिकट आहे ,अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची कसलीही आर्थिक मदत नाही, पीक विम्याचे पैसे नाहीत, अशा परिस्थितीत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने शेतकऱ्यांच्या शेतातील व घरातील वीज कनेक्शन कापण्याची मोहीम हाती घेतली आहे. कोरोणा सदृश्य परिस्थिती तीन  महिन्याचे वीज बिल माफ करावे यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत तालुक्यात खांडवी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करून शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधले. स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर,विदर्भ युवा अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या मार्गदर्शनात स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष नितीन पाटील-पाचपोर आणि शेकडो कार्यकर्त्यांनी दिनांक १९मार्च रोजी नांदुरा -जळगाव (जामोद) मार्गावर खांडवी येथे रस्ता रोको आंदोलन केले.परिसरातील नागरिकांनी या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. हे आंदोलन तालुकाध्यक्ष नितीन पाटील-पाचपोर यांचे सह माजी सरपंच मंगल डोंगरदिवे, बळीराम सारोकार,कोमल सावकार,धम्मा तायडे, दिलीप पाटोळे, संदेश डोंगरदिवे, राहुल डोंगरदिवे, अतुल डोंगरदिवे, राजू तायडे, अनंता सरोकार, रवींद्र डोंगरदिवे, विनोद डोंगरदिवे उमेश सावकार उमेश डोंगरदिवे रोशन डोंगरदिवे गौतम डोंगरदिवे दिलीप डोंगरदिवे, योगेश बावस्कार, दिलीप गाडे, गजानन इंगळे, संताराम चंदनकार, दिगंबर सरोकार, विजय इंगळे, गणेश साटोटे, वैभव चोपडे, पुरुषोत्तम सारखेडे, शरद टेलर, गजानन तायडे ,रितेश तायडे, तुकाराम उंबरकर,विजयकुमार डोंगर दिवे, भीमराव डोंगरदिवे ,संतोष बावस्कार, दिलीप भगत ,चेतन ढाके, भुषण चौधरी, पांडू सोनवणे, चेतन चौधरी, गणेश धामोळे यांचेसह परिसरातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी. खासदार राजू शेट्टी यांनी शासनाकडे कोरोणा सदृश्य परिस्थिती तीन महिन्याचे वीज बिल माफ करावे, अशी वारंवार मागणी केली होती. परंतु त्यांच्या या मागणीची दखल न घेतल्यामुळे त्यांनी आज राज्यभर रास्ता रोकोचा इशारा दिला होता. त्याचाच एक भाग म्हणून आज खांडवी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तालुकाध्यक्ष नितीन पाटील पाचपोर यांच्या नेतृतृत्वात रास्ता रोको आंदोलन केले.

Previous Post Next Post