बुलढाणा येथे मुंडे दंत रुग्णालयात मोफत दंत चिकित्सा शिबीर. - गरजूंनी लाभ घेण्याचे आवाहन...

बुलडाणा प्रतिनिधी:-

 कोणतीही आरोग्यसेवा असो, ती गरजूंना तत्परतेने मिळायला हवी. याच उदात्त उद्देशाने येथील मुंडे दंत रुग्णालयाच्यावतीने करुणा नियमाचे काटेकोरपणे पालन करून मोफत दंत व मुखरोग तपासणी शिबीराचे आयोजन १५ ते ३१ मार्च दरम्यान करण्यात आले आहे. गरजूंनी या शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.बुलढाणा शहरातील बँक ऑफ महाराष्ट्र समोरील मुंडे दंत रुग्णालयात १५ ते ३१ मार्च दरम्यान चालणाऱ्या या दंत व मुखरोग तपासणी शिबीरात सकाळी ११ ते सांयकाळी ५ वाजे पर्यंत गरजूंची तपासणी करण्यात येणार आहे. यामध्ये कॉम्प्यूटर एक्स रे, पूर्ण कवळी बसविणे, अक्कलदाढीची शस्त्रक्रिया, वेडे वाकडे दात सरळ करणे, मौखीक कॅन्सर निदान व मार्गदर्शन आदी सुविधा उपलब्ध असणार आहे. या शिबीराचा गरजूंनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. सतीश मुंडे व डॉ. सोनाली मुंडे यांनी केले आहे.

 

Previous Post Next Post