खडीमलचे ग्रामसेवक गायब मुख्यालयी हजर करा ५०० रुपये मिळवा ग्रामपंचायत वर लागले पत्रक...


 राजु भास्करे:-अमरावती जिल्हा प्रतिनिधी 

मेळघाटातील आरोग्यसेवेसह प्रशासकीय सेवेचाही बोजवारा उडाला असल्याचे दिसुन येते.कुठलाच शासकिय कर्मचारी मुख्यालयी राहत नसुन फक्त हजेरीपत्रकावर एकदा सही करुन रफुचक्कर होत पगार घेण्यात धन्यता मानत आहे. काही ठिकाणी ग्रामसेवक महिनोनमहीने हजर नसल्याने आमचा ग्रामसेवक मुख्यालयी आणुन द्या व ५०० रुपये बक्षीस मिळवा असे म्हणत ग्रामपंचातच्या दर्शनी भागात पोस्टर लावण्याची वेळ खडीमल  ग्रामस्थावर आली असुन तशा आशयाची तक्रार गटविकास अधिकारी चिखलदरा यांचेकडे केल्याने प्रशासनात खळबळ माजली.


  खडीमल ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार ग्रामसेवक यशवंत.जी.जाधव सातत्याने अनुपस्थीत असुन गत पंधरवाड्यात मुखदर्शन झाले नाही. गावात उन्हाळ्यापुर्वीच भीषण पाणी टंचाई भासत आहे ग्रामसेवकच मुख्यालयी नसल्याने विविध समस्या निर्माण झाल्या असता गावकरी पुरते त्रासले. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार जाधव रुजु झालेल्या दिवसापासुन आजतागात सततच्या मिटींग (सभा) ची सबब सांगुन गावात राहणे टाळतात. नियुक्ती ठिकाणच्या मुख्यालयी राहणे बंंधनकारक असल्यावरही ग्रामसेवक जाधव कधीच थांबले नसल्याने गावातील समस्यांच्या तक्रारी अडचणी कुणाकडे मांडायच्या असा प्रश्न ग्रामपंचायत पदाधिकार्‍याना पडल्याने ग्रामस्थानी ग्रामसेवक दाखवा ५०० रुपये मिळवा हि अफलातुन शक्कल लढवत पोस्टर लावले. खडीमलच्या सरपंच तुलसी बेठेकर व सदस्य, व गावातील नागरिकांनी यानी जिल्हा मुख्यकार्यपालन अधिकारी अमरावती सह  प्रकाश पोळ खंड विकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केली. मुख्यालयी हजर असने बंधनकारक असताना शासनाचा लाखो रुपयाचा निधी कुठे व कसा खर्च होतो हे न उलगडणारे कोडे असुन ग्रामसेवकाचे वेतन अदा करणेकरीता सरपंचाचा दाखला गरजेचा आहे तरी यांचे वेतन दरमहा नियमीत कसे केल्या जाते नेमके पाणी मुरते तरी कुठे बेपत्ता जाधव ग्रामसेवक यांच्यावर कारवाई करुन मुख्यालयी हजर करा व समस्यांचा निपटारा करावा- ग्रामस्थ खडीमल.

प्रतिक्रिया..-

 सदर्हु पत्रक (पोस्टर) व तक्रार सुडभावनेतुन असुन मी गेल्या ४ वर्षापासुन नियमीत सेवा देत आहे सरपंचासह सदस्य याना माझ्याविरुद्ध तक्रार करण्यास बाध्य करत आहे- यशवंत जाधव ग्रामसेवक ग्रा. पं. खडीमल **


शुक्रवारी सदर ग्रामसेवक शासकिय बैठकीला हजर होते, ग्रामस्थांच्या तक्रारी जाणुन निकालात काढण्याचे आदेश दिले व तक्रार माझ्याकडे आली नाही आल्यावर शहानिशा करु- प्रकाश पोळ खंडविकास अधिकारी चिखलदरा.

Previous Post Next Post