डॉ.अण्णा भाऊ साठे स्मारक सौंदर्यीकरनाचा निर्णय त्वरित घ्या अन्यथा स्वाभिमानीचे 28 जुलै आमरन उपोषण...


 शेगाव तालुका प्रतिनिधी:-

मागील दोन वर्षा पासून साहित्य रत्न डॉ. अण्णा भाऊ साठे याचे स्मारक होण्याकरिता स्वाभिमानी शेतकरी संघटने कडून निवेदन देण्यात येत असून. उद्यापर्यंत साहित्य रत्न लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकचे सौंदर्यीकरण होत नाही व तसा ठराव नगर परिषद कडून घेतल्या जात नसल्याने ही स्थापत्य वागणूक समजण्या पलीकडची आहे. 1993 आगोदर पासून असलेले डॉ. अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक शेगाव शहरात उपेक्षितच आहे. यंदा चे वर्ष डॉ.अण्णा भाऊ साठे यांचे जन्म शताब्दी वर्ष म्हणून साजरे होणार असून त्याचे महाराष्ट्रा करिता असलेले योगदान न विसरण्यासारखे आहे.डॉ.अण्णाभाऊ साठे यांनी  सयुक्त महाराष्ट्र चळवळीत मोलाची कामगिरी बजावली निटीने लढा दिला. सयुक्त महाराष्ट्रा च्या लढाईत आपल्या प्रबोधनाने लोकांना जागृत करून चळवळीमध्ये सामील होण्यास प्रवृत्त केले.त्यांनी साहित्याच्या लेखणीच्या माध्यमातून शोषितांचा वंचितांचा आवाज बुलंद केला. भारतीय स्वातंत्र्य चाळवळ, सयूक्त महाराष्ट्र, गोवा मुक्ति सग्रामा चळवळी मध्ये सिहंचा वाटा दिला. अश्या थोर समाज सुधारक  साहित्यरत्न डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकाचे  सौंदर्यीकरण निवेदन दरण्याच्या अगोदरच व्हावे होते. परंतु असे होत्यांना असत दिसत नाही.खूप झाले निवेदन खूप झाले तोंडी आश्वासन आता आक्रमक होऊन डॉ. अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक सौंदर्यीकरण न झल्यास कोणत्याही थळाला जाऊ  त्या अगोदर गांधी मार्गाने शेवटचा प्रयत्न. म्हणून दि. 28 जुलै ला आमरण उपोषण करण्यात येईल असे विधान स्वाभिमानी शेगाव शहर अध्यक्ष गोपाल तायडे यांनी केले.या वेळेस गोपाल सु. तायडे.सागर तायडे मंगेश पाटील. जय पवार. हे कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post Next Post