प्रेरणा दिनानिमित्त जळगांव जामोद शिक्षक सेना परिवाराचे जळगांव जामोद पोलीस ठाण्यात वृक्षारोपण...


 जळगांव जा.प्रतिनिधी:-

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जळगांव जामोद तालुका शिक्षक सेना परिवाराकडून पोलीस स्टेशन जळगाव जामोद येथे आज सकाळी 10:30 वा  ठाणेदार श्री जाधव साहेब आणि त्यांचे सहकारी अधिकारी यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले.सर्वप्रथम कोविड काळात पोलीस विभागाने केलेल्या अतुलनीय कामाबद्दल ठाणेदार सुनिल जाधव,ए पी आय सतिष आडे,ए.पि.आय सागर भास्कर,पी एस आय सचिन वाकडे,मदन साहेब,धामोडे साहेब यांचा प्रातिनिधीक स्वरूपात शिक्षक सेना परिवाराच्या वतीने शाल आणि बुके देऊन सत्कार करण्यात आला.सोबतच शिक्षण विस्तार अधिकारी तायडे साहेब यांचाही सत्कार करण्यात आला.तदनंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते पोलीस स्टेशन आवारात दीर्घायुषी वृक्षांचे रोपण करण्यात आले.यावेळी शिक्षक सेना तालुकाध्यक्ष  श्रीकृष्ण भटकर, सहसंपर्क प्रमुख उमेश खारोडे, सरचिटणीस दिलीपकुमार वानखडे,कार्याध्यक्ष निलेश काळे,सचिव संतोष वेरुळकर, कोषाध्यक्ष आशिष चिंचोळकर,प्रसिद्धी प्रमुख अनिल भगत,संघटक समाधान निकम,संदीप इंगळे,सुभाष गवई,जिल्हा प्रतिनिधी सुनील हिस्सल,ज्येष्ठ शिक्षक भिमानंद तायडे सर,शिक्षण विभागाचे प्रतिनिधी शिक्षण विस्तार अधिकारी तायडे साहेब तर पोलीस विभागाचे संजय राउत, निलेश पुंडे,अमोल वनारे,वावगे हे उपस्थित होते.सदर छोटेखानी सत्कार समारंभ आणि वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडला.शिक्षक सेना परिवाराच्या वतीने सर्वांना फलाहार आणि चहापान करण्यात आले.

Previous Post Next Post