संग्रामपूर जळगाव शेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना विमा मिळण्याचा मार्ग मोकळा..


 संग्रामपूर ता.प्रतिनिधी:-

 पुणे येथे कृषी आयुक्त कार्यालयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पिक विम्याची नुकसान भरपाई मिळण्यासाठी २६ जुलै रोजी केलेल्या आंदोलनाने बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर जळगाव व शेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर व युवती प्रदेशाध्यक्षा पुजाताई मोरे यांच्या नेतृत्वात विदर्भ मराठवाड्यातील हजारो शेतकरी कृषी आयुक्त कार्यालयावर आपल्या न्याय हक्कासाठी धडकले होते. सकाळी ११ वाजता आंदोलनाला सुरुवात करण्यात आली पंरतु या आंदोलनामध्ये मा.राजु शेट्टी यांनी विशेष लक्ष घातल्याने आंदोलनाचे स्वरुप राज्यव्यापी होणार असल्याचे लक्षात येताच आयुक्त कार्यालयाची चांगलिच तारांबळ उडाली. त्यामुळे तत्काळ या आंदोलनाची दखल घेत कृषीमंत्री दादासाहेब भुसे यांनी स्वतः प्रशांत डिक्कर यांना फोन करुण आंदोलनाची सर्व पार्श्वभूमी ऐकून घेतली आणी कृषी आयुक्त यांना तत्काळ स्वाभिमानीच्या शिष्टमंडळा सोबत बैठक घेण्याची सुचना केली. आयुक्त यांनी स्वाभिमानीच्या शिष्टमंडळास बैठकीला आमंत्रीत करुन दुपारी तिन वाजता बैठकीला सुरुवात झाली. चार तास चाललेल्या बैठकीमध्ये बिड जालना बुलडाणा सह ईतर जिल्ह्यातील पिक विमा प्रश्नावर चर्चा करून बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर, जळगाव व शेगाव तालुक्यातील पिकाच्या उत्पन्नावर आधारित प्रलंबित नुकसान भरपाई देण्याचे आयुक्त यांनी वरीष्टांशी संपर्क करुन कबुल केले. नुकसान भरपाई अदा करण्याची कारवाई संदर्भात लेखी दिलेल्या पत्रात स्पष्ट नमुद करुण. केंद्र व राज्य हिस्सा विमा हप्ता अनुदान प्राप्त होताच विमा रक्कम कंपनी मार्फत वितरीत करण्याची कारवाई करण्यात येईल. असे कृषी संचालक विकास पाटील व मुख्य सांख्यिक उदय देशमुख यांनी बैठकीत बोलतांना सांगितले. या बैठकीत सकारात्मक चर्चेअंती बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार स्वाभिमानीच्या शिष्टमंडळास लेखी पत्राव्दारे आश्वासन देण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील संग्रामपूर जळगाव व शेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना पिक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे स्वाभिमानी ने आक्रमक पवित्र्याने चालु केलेले आंदोलन स्थगित करण्यात आले. या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पिक विमा प्रश्नावर दहा महिने पासून सुरू असलेल्या लढ्याने संग्रामपूर जळगाव शेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा मिळाला आहे. या आंदोलनामध्ये स्वाभिमानीचे मराठवाडा अध्यक्ष गजानन पाटील बंगाळे, स्वाभिमानीचे नेते प्रकाश तात्या मालवडकर,बापु साहेब करांडे, मराठवाडा संपर्क प्रमुख निवृत्ती महाराज शेवाळे,अशोक बापु मुटकुळे,उज्वल चोपडे,विजय ठाकरे,तेजराव लोणे, योगेश मुरुख,सुपडा सोनोने, तुकाराम पाटील,गजानन आमझरे यांच्या सह प्रमुख पदाधिकारी सह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

Previous Post Next Post