मेळघाटातील अतिदुर्गम भागातील इंडियन बैंक शाखा जारीदा येथील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणेमुळे येथील शेतकऱ्यांना पिक कर्ज माफी पासुन वंचित ठेवण्यात आले असल्याचे आरोप जारिदा शाखेत येनाऱ्यां गावातील शेतकऱ्यांचे मनने आहे. शेतकऱ्यांचे हे सुधा मनने आहे की आम्ही जेव्हा माफी बंदल विचारले की आम्हाला उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. व इतकेच नव्हे तर सदर शाखेचे मॅनेजर मोहाडीकर व सहाय्यक योगेंद्र लोकांच्या घरी जाऊन कोऱ्या बुकलेट व स्लिप वर सह्या करून त्यांचे नुतनीकरण करीत आहे. व शेतकऱ्यांच्या सेव्हिंग खात्यातील व घरकुलाच्या पैशातून रक्कम कपात करत असल्याचे सांगितले जात आहे. शेतकरी कर्ज माफी योजनेस पात्र असतांना ते वसुली व नुतनीकरणाचे काम करीत आहे. सहकारी अधिकारी गडलिंग यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की. बँकेने शेतकऱ्यांची माहिती संबंधित पोर्टलवर अपलोड केलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना या योजने पासुन वंचित रहावे लागले आहे. बॅंकेचे कर्मचारी कोऱ्या स्लिप वर सही व अंगठा घेत आहे. व फक्त कागदोपत्री शेतकऱ्यांचा भरणा व उचलना दाखवुन शासनाची दिशाभूल करीत आहे. सदर बॅकेत जवळपास २०० कर्जदार शेतकऱ्यांना माफीचे नुतनीकरण करून बॅंकेचे चालु वर्षात कर्ज वाटप केल्याचे सांगुन शासनाची दिशाभूल करीत आहे. मनुन सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा असी मागणी राहुल येवले युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचिव , नरेंद्र टाले, नारू मुंडे, संजु अलोकार, विनोद धिक्कार, लालचंद्र सावलकर, नमाय टोटा, संकु भुसुम, बालाराम बेठेकर, संदीप मुंडे, आदींनी केली आहे.
इंडियन बैंक जारिदा शाखेची महात्मा ज्योतिबा फुले पिक कर्ज योजनेची चौकशी करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा जिल्हाधिकारी यांना शेतकऱ्यांनी दिले निवेदन..
राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी