चिखली पोलीस स्टेशन हद्दीतील मोबाईल चोरटे स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात...

बुलढाणा जिल्हा विशेष प्रतिनिधी:-अनिल भगत.

चिखली पोलीस स्टेशन च्या हद्दीत दिनांक 23 जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांना गुप्त बातमी दाराच्या माहितीवरून सुगावा लागला की काही अट्टल मोबाईल चोर हे मोबाईल चोरी करून नागरिकांना गंडवितात. अशा गुप्त माहितीच्या आधारे माननीय पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया अप्पर पोलीस अधीक्षक श्री बजरंग बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्री गीते यांच्या आदेशाने दिनांक 23 जुलै रोजी चिखली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा ने गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून दोन अट्टल मोबाईल चोरट्यास पकडून जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून 11 मोबाईल व रोख रक्कम दहा हजार रुपये असा एकूण एक लाख 35 हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केला आहे. सदर आरोपींची  नावे पुढीलप्रमाणे आहेत. विशाल जायवाल राहणार गवळीपुरा चिखली व दुसरा आरोपी शुभम नावकार राहणार राऊतवाडी चिखली यांना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन त्यांच्याजवळी मुद्देमाल जप्त करीत पोलीस स्टेशन चिखली येथे ताब्यात दिले आहे. त्यांच्यावर अपराध नंबर 192/2021 चे कलम 380,457 भारतीय दंडविधान नुसार चिखली पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा चे पोलीस उपनिरीक्षक निलेश शेळके, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जिंदमवार, गजानन आहेर संजय नागवे विजय सोनोने चालक विजय मुंढे तसेच सायबर सेल चे राजू आढवे यांनी ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली. सदर कारवाईमुळे अवैध धंदे व्यवसायिक,चोरटे, यांच्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेची दहशत निर्माण झाली आहे या कारवायांमुळे अवैध धंदेवाल्यांचे अवैध व्यवसाय बंद झाले आहेत.

 

Previous Post Next Post