हिवरखेड च्या तरुणाचा खटकाली येथिल जत्रा डोहात बुडून मुत्यु,


 राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी 

हिवरखेड येथील २२ वर्षाचा तरुण त्याच्या मित्रांसोबत चिखलधरा निसर्गरम्य पर्यटन बघण्यासाठी गेला असता दिनांक २३ जुलैच्या दुपारी खटकाली येथिल जत्रा डोहात बुडाल्याची माहिती शोशल मीडियावर व्हायरल झाली होती,  घटनास्थळी चिखलधरा पोलिसांनी पाहणी केली व तपास सुरू केला असता शनिवारी सकाळी ५ वाजता बाॅडी पाण्याच्या बाहेर काढण्यात आल्याची माहीती चिखलदरा येथिल ठाणेदार वाढवे साहेब यांनी सांगितले आहे. तरुणाचे कुटूंब सुद्धा तरुणाला पाहण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली. समीर बेग शकिल बेग रा इंदिरानगर हिवरखेड येथील असल्याची ओळख पटली असून तरुणाचा शोध घेण्यात रात्री हुशारा यश आल्याची माहिती सूत्रांनी दिली तरुणाला डोहातून बाहेर काढून पाहिले  असता तरुणाचा डोहात मुत्यु झाल्याची माहिती कळाली तरुणाला मृत्यू घोषित करण्यात आले असून समीर नामक युवकाचा मर्ग तपासण्यासाठी पाठवण्यात आला.

Previous Post Next Post