केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची सकारत्मक यशस्वी भेट.वरणगाव शहराबाहेरून बायपास गेल्याने शहरातील नागरिकांचे व व्यापारी वर्गाचे अस्तिवावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले संपूर्ण वाहतूक बाहेरून जात असल्याने वरणगाव शहराचे अस्तित्व संपण्याच्या मार्गावर आहे मात्र वरणगावकरांचे अस्तित्व संपू देणार नाही ही खूणगाठ मनाशी बांधून वरणगावचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी 14 व 15 जुलै रोजी राष्ट्रीय संयोजक डॉ राजेंद्रजी फडके यांच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांची दिल्लीत भेट घेतली व निवेदन दिले होते मी नागपुरात असतांना संपूर्ण प्रस्ताव घेऊन या तिथे सर्व अधिकारी असतील तिथे निर्णय घेउ असे सांगितले होते त्याअनुषंगाने आज नागपूर मध्ये पुन्हा केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांची भेट डॉ राजेंद्रजी फडके यांच्या माध्यमातून माजी नगराध्यक्ष सुनील काळे शहराध्यक्ष सुनिल माळी किरणं धुंदे यांनी भेट घेत विस्तृत प्रस्तावा दिला त्या प्रस्तावात फुलागाव फाटा बसस्थानक चौक ते साईबाबा मंदिरापर्यंत समांतर महामार्ग बनविणे व त्यात दुभाजक टाकून लाईट( एलईडी) लावणे बस स्थानक चौक येथे भव्य सर्कल नागरिकांनां बसण्यासाठी व बस स्टफ प्रवासी शेड तसेच शिवाजी नगर बसस्थानक सदानंद टॉकीज व सातमोऱ्यावरील पूल नवीन बांधणे तसेच तीर्थक्षेत्र नागेश्वर ते वरणगाव ऑर्डन्स फएक्ट्री दरम्यान रस्ता बनविणे या मागण्या सविस्तर प्रस्तावात केल्या आहे. केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी संपूर्ण बाजू शांततेत ऐकून घेतली व समांतर महामार्गाच्या कामाची सकारत्मकता दाखवली यावेळी केंद्रीय मंत्री मा नितीनजी गडकरी यांचे व डॉ राजेंद्रजी फडके नही चे राज्यस्तरावरील अफहिकारी यांचेआभार माजी नगराध्यक्ष सुनील काळे व शहराध्यक्ष सुनील माळी भाजपा शहर चिटणीस किरण धुंध्ये यांनी मानले
वरणगाव शहरातील समांतर महार्गासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची पुन्हा नागपुरात माजी नगराध्यक्ष सुनील काळेंनीं घेतली भेट...
वरणगाव प्रतिनिधी - सुनील पाचपोळ