मेंढपाळांना चराई क्षेत्र व पासेस उपलब्ध करून द्या. एआय एम आय एम चे वनपरिक्षेत्र अधिकारी व उपविभागीय अधिकारी यांना निवेदन...

जळगांव जा.तालुका प्रतिनिधी:-

जळगाव जामोद तालुक्यातील ग्राम सुनगाव परिसरातील धनगर समाज बांधवांचा वंशपरंपरागत शेळी व मेंढी पालन करण्याचा पिढीजात व्यवसाय आहे.धनगर मेंढपाळ बांधवावर कोरोना महामारी मुळे सध्या नैसर्गिक संकट ओढविले आहे.त्यात आणखी भर म्हणून वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून या मेंढपाळ बांधवांना चराई वर बंदी घालण्याचा प्रकार सुनगाव येथे झालेला आहे. तरी उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद व वन परिक्षेत्र अधिकारी जळगाव जामोद यांनी सदर प्रकरणांमध्ये लक्ष घालून शेळी मेंढी पालन व्यवसाय करणाऱ्या धनगर समाजातील मेंढपाळांना उपजीविकेच्या दृष्टीने मेढ्यांना चराईसाठी जागा  उपलब्ध करून द्यावी.तसेच मेंढपाळ बांधवाना नाहक त्रास दिल्यास ए आय एम आय एम च्या वतीने जळगाव जामोद तालुकामध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल त्यानंतर होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला.यावेळी ए आय एम आय एम चे शहर अध्यक्ष समीर अहमद जलील अहमद यांनी सदर निवेदन दिले आहे.

 

Previous Post Next Post