स्टेट बँक कृषी शाखा व्यवस्थापक त्वरित रुजू करा युवक काँग्रेसची मागणी...


बुलढाणा जिल्हा विशेष प्रतिनिधी:-अनिल भगत.

लकापुर तालुका व शहर युवक काँग्रेसच्या वतीने 30 जुलै रोजी शेतकऱ्यांना पिक कर्जाच्या महत्त्वाच्या विषयाच्या बाबतीत बँकेच्या व्यवस्थापनाने दुर्लक्ष केल्यामुळे स्टेट बँक कृषी शाखा मलकापूर येथे जवळपास दीड महिन्यापासून शाखा व्यवस्थापक नसल्यामुळे शेतकऱ्यांचे हाल अपेष्टा पहावल्या जात नव्हती त्या उद्देशाने शाखा व्यवस्थापकाच्या केबिन ची पूजा करूनयुवक काँग्रेसच्या माध्यमातून एक आगळे वेगळे आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन बुलढाणा जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष संभाजी शिर्के देशमुख यांच्या नेतृत्वात करण्यात आले त्यासंदर्भात उपविभागीय अधिकारी मलकापूर यांना निवेदन सादर केले त्या निवेदनामध्ये त्यांनी म्हटले आहे की जर लवकरात लवकर पूर्णवेळ शाखा व्यवस्थापक म्हणून या ठिकाणी रुजू झाले नाही तर हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल या निवेदनावर बुलढाणा जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष संभाजी शिर्के देशमुख, तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष राजू जवरे, काँग्रेसचे महावितरण समितीचे प्रमुख दीपकसिंग मोरे,  तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष एडवोकेट दिलीप बगाडे,  शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष तुषार साबळे,  शहर अध्यक्ष भूषण सनिसे, संदीप चोरे, ईश्वर भदाले, तेजस घुले पाटील, निखिल कोळी, दीपक जाधव, पवन रायपुरे, मयूर नरवाडे, विकास भगत इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या निवेदनावर सह्या आहेत.

Previous Post Next Post