ऑल इंडिया त्यानंतर पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष भाई दिपक केदार यांच्यावर दिनांक ३०/७/२०२१ रोजी प्राणघातक हल्ला करण्यात आला या हल्ल्याचा निषेध म्हणून जळगाव जामोद अखिल भारतीय पॅंथर सेना व इतर सामाजिक संघटनेच्या वतीने दिनांक 31 जुलै रोजी निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की भाई केदार व परभणी जिल्हाध्यक्ष भिमराज गोटे हेआपल्या कार्यकर्त्यांच्या सोबत परभणी तालुक्यातील सेलूद येथे एका अत्याचारग्रस्त परिवाराला न्याय देण्यासाठी व त्या परिवाराला सांत्वनपर भेट देण्यासाठी गेले होते व त्यानंतर तेथून परत येताना काही जातीवादी गुंडांनी भाई केदार व त्यांच्या सहकार्यावर प्राणघातक हल्ला केला या हल्ल्यामध्ये परभणी जिल्हाध्यक्ष भिमराज गोटे गंभीर जखमी झाले भाई केदार यांच्या गाडीचे फार मोठे नुकसान करण्यात आले त्या अनुषंगाने ऑल इंडिया पॅंथर सेना व आंबेडकरी संघटना यांच्या वतीने मा,गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांना जळगाव जामोद चे तहसीलदार साहेब यांच्यामार्फत निषेध निवेदन देण्यात आले या निवेदनामध्ये हल्लेखोर आरोपींना तात्काळ अटक करून गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावे अन्यथा महाराष्ट्रातील सर्व आंबेडकरी संघटनांसह अखिल भारतीय पॅंथर सेना लोकशाही मार्गाने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल याची सर्वस्वी जबाबदारी शासन प्रशासनाची राहील अशा प्रकारे निवेदनात नमूद आहे या निवेदनावर आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते भिकाजी वस्ताद वानखडे ,भारिप बहुजन महासंघाचे माजी तालुकाध्यक्ष रतन नाईक, भाई देवानंद दामोदर,सुनिलभाऊ बोदडे, रमेशभाऊ नाईक,सुरेन्द्र आगरकर,प्रशांत अवसरमोल,विजय जुमळे, प्रशांत शेगोकार, गुलाबराव आठवले,दादाराव पारवे,स्वप्निल गवई, राहुल शेगोकार, साहेबराव भगत, आनंद अवसरमोल, प्रमोद पारवे,सह असंख्य कार्यकर्ते हजर होते.
पॅंथर सेनेचे भाई केदार यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा वंचित बहुजन आघाडी जळगाव जामोद तालुक्याच्या वतीने निषेध...
जळगांव जामोद प्रतिनिधी:-