स्थानिक जळगांव जामोद येथील श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयामध्ये गुरुवार दिनांक 22 जुलै 2021 रोजी शैक्षणिक सत्र 2019 -20 मधील बीए बीकॉम अंतिम वर्ष विद्यार्थ्यांचे पदवी वितरण करण्यात आले.या पदवी वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर रामचंद्र देशमुख होते तर कार्यक्रमाचे उद्घाटन जळगाव शिक्षण मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष अनिल जी जयस्वाल यांच्या हस्ते झाले व्यासपीठावर विशेष उपस्थिती म्हणून जळगाव शिक्षण मंडळाचे सहसचिव श्री मिलिंद जी जोशी पदवी वितरण कार्यक्रमाचे समन्वयक प्राध्यापक डॉक्टर निलेश निंबाळकर व सांस्कृतिक कार्यक्रम समन्वयक प्राध्यापक गिरीश कुलकर्णी हे होते. आपल्या उद्घाटनपर मार्गदर्शना मध्ये माननीय अनिल जी जयस्वाल यांनी पदवी प्राप्त करणे हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण टप्पा असून विद्यार्थी-विद्यार्थिनींनी व्यक्तिगत उत्कर्षा बरोबरच एक नागरिक म्हणून राष्ट्रहिताच्या दृष्टीने आपली भूमिका पार पाडावी असे विचार मांडले.उद्घाटनपर मार्गदर्शनानंतर व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदव्यांचे वितरण करण्यात आले.त्यानंतर मान्यवरांची मार्गदर्शन पर भाषणे झाली विद्यार्थ्यांनी पदवी बरोबरच कौशल्य विकास अभ्यासक्रमाकडे वळावेत असे मिलिंद जोशी यांनी सांगितले तर अध्यक्षीय भाषणामध्ये माननीय प्राचार्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये विद्यार्थ्यांनी पदवी व पदव्युत्तर शिक्षणाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे असे मत मांडले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर निलेश निंबाळकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक गिरीष कुलकर्णी यांनी पार पाडले कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक प्राध्यापक बावस्कर व प्राध्यापक सायखेडे यांनी केले तर विद्यार्थी नोंदणी ची जबाबदारी श्री अभिजीत माटे यांनी पार पाडली कार्यक्रमाला पदवी प्राप्त विद्याथ्याॆंबराेबर महाविद्यालयीन प्राध्यापक तसेच कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयात पदवी वितरण समारंभ संपन्न..
जळगांव जा.प्रतिनिधी:-
