रंबाग येथे विजेच्या जिवंत तारेने शॉक लागून बैलाचा मृत्यू...


 राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी 

धारणी तालुक्यातील टीटम्बा जवळील रांबाग येथील ध्रुपाल हिरालाल भिलावेकार  हे धोद्रा फाट्यावरील आपल्या शेतातून आपले दोन बैल गावाकडे घेऊन जाताना लोम्बणारे विजेच्या जिवंत तारेने बैलाच्या पायात तार गुंतून शॉक लागला त्यामुळे बैलाचा जागीच मृत्यू झाला.ध्रुपाल हिरालाल भिलावेकर यांच्या शेतातून विजेची मोठी वहीका गेली आहे. त्यातील तार तुटल्याने लोम्बकळत असता शेताच्या धुऱ्यावरून बैल घेऊन जाताना ध्रुपाल यांच्या एका बैलाच्या पायात तार अडकली व तारे मध्ये विद्युत प्रवाह जिवंत असल्याने बैलाचा जागीच मृत्यू झाला.सुदैवाने ध्रुपाल व एक बैल सुखरूप वाचले.

Previous Post Next Post