धारणी येथे अमरावती जिल्हा पोलिस पाटील (असो.) संघटनेची बैठक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल उके पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. प्रशासकीय कामात पोलिस पाटील यांना होत असलेला ञास आणि पोलिस पाटील अधिनियमाची होत नसलेली अंमलबजावणी या बाबतीत चर्चा करण्यात आली. शासन अध्यादेशानुसार पोलिस पाटील यांना प्रवास भत्ता मंजूर असून तो गेल्या कित्येक वर्षांपासून थकीत आहे, तुटपुंज्या मानधनावर पोलिस पाटील काम करतो पोलिस पाटील हा शासकीय कर्मचारी म्हणून त्यांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन मिळने गरजेचे आहे याबाबत राज्य पातळीवर संघटनेच्या वतीने पाठपुरावा करण्यात येत असून भा.द.वी ३५३ कलम पोलिस पाटील यांच्या करिता लागु करण्यात आली आहे. मेळघाट अती दुर्गम भाग असल्याने येथील पोलिस पाटील यांना वेगळा न्याय शासनाने दिला पाहिजे अश्या अनेक प्रलंबित विषयासंदर्भात बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीत धारणी पोलिस स्टेशन ठाणेदार श्री.बेलखडे प्रमुख उपस्थितीत होते. अमरावती जिल्हा पोलिस पाटील संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष तथा आदर्श पोलिस पाटील पुरस्कार प्राप्त पोलिस पाटील कमलसिंग वाघमारे पाटील यांनी प्रास्ताविक केले. या बैठकीला अमरावती जिल्हा उपाध्यक्ष नितीन गोरले पाटील, विदर्भ महासचिव प्रा.टि.बी.रामटेके पाटील, जेष्ठ पोलिस पाटील निलाकांत पुसदेकर पाटील, तालुका अध्यक्ष धारणी रामुतारा आकवा पाटील, संदीप नेवारे पाटील व धारणी तालुक्यातील सर्व पोलीस पाटील उपस्थित होते.तालुक्यातील युवा पोलिस यांनी बैठक आयोजित करुन आपल्या मागण्या संघटनेच्या माध्यमातून शासनापर्यंत पोहचविण्यासाठी संघटनेच्या पाठीशी उभे राहुन कार्य करण्याचा मानस व्यक्त केला आहे. शत्रुघ्न बिसराम भिलावेकर पाटील, रामदास मावस्कर पाटील, नंदलाल भिलावेकर पाटील, बहादुर कासदेकर पाटील,अजय नागपुरकर पाटील,राधाकिसन श्रीसाट पाटील, ईश्वर भिलावेकर पाटील, मनोज कासदेकर,रुपाला भिलावेकर पाटील आदींनी आपले मत व्यक्त केले.
धारणी येथे पोलिस पाटील संघटनेची बैठक..
राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी
