अखिल गुरव समाज संघटनेचे विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन...


 बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सुरज देशमुख.

गुरव समाज संघटना बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने आज गुरव समाजाच्या विविध प्रकारच्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत सन्मानिय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर केले यामध्ये कोवीड मुळे मंदिर बंद असल्या कारणाने गुरव पुजारी यावर उपासमारीची वेळ आली आहे अतिशय नाजूक परिस्थितीमध्ये हा समाज जीवन जगत आहे शासनाने या समाजाला आर्थिक मदत करावी तसेच सर्व समाज बांधवांचे 100% लसीकरण व्हावे आणि जे बेल फुल  वाटप व्यवसाय आहे तो पूर्व सुरळीत चालू व्हावा अशा मागण्याचे निवेदन आज बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने देण्यात आले यावेळी सन्माननीय जिल्हाध्यक्ष गोपाल भाऊ सोनटक्के युवा जिल्हाध्यक्ष सौरभ सिरस्कार  खामगाव तालुका अध्यक्ष सच्चू पारखेडकर चिखली तालुका अध्यक्ष गजानन गणेश कर जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रेय वाघमारे मेहकर शहरप्रमुख मुकुंद मामा विटकरे रमेश इंगळे शुभम अरुण इंगळे प्रथमेश विटकरे विनय आगरकर सागर चिंचोळकर संजू भाऊ सपकाळ प्रमोद राव सपकाळ बाळासाहेब दांडगे यांची उपस्थिती होती.

Previous Post Next Post