श्री सदगुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाचे वतीने गुरू पोर्णिमा अत्यंत साध्या पद्धतीने साजरी...


 बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी:- सुरज देशमुख 

खामगाव स्थानिक सतिफैल भागातील श्री सदगुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने दरवर्षी गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो  परंतु या वर्षी कोरोना महामारीचा वाढता प्रसार व लाॅकडाऊन मुळेची   मागील वर्षी प्रमाणे या वर्षी सुध्दा सोशलडिस्टनसिंग चे नियम पाळत मंडळाच्या एकनिष्ठ सदस्या स्व प्रमिलाबाई देशमुख यांच्या घरी अत्यंत साध्या पध्दतीने गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला या मध्ये दिं १६/७/२०२१ शुक्रवार पासुन दररोज सकाळी ९ ते १  श्री ज्ञानेश्वरी पारायण,संध्याकाळी ५ ते ६ हरिपाठ  रात्री ९ ते १0 श्री सदगुरू स्तोत्र पारायण गुरुमंत्र, नामस्मरण करण्यात आले आज दिं २३/७/२०२१ शुक्रवार रोजी जास्त गर्दी न करता सकाळी ९ ते ११ नामस्मरण. व महाआरती करून प्रसाद वाटप करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी माजी नगराध्यक्ष गणेशभाऊ माने. योग शिक्षक कल्याणभाऊ गलांडे.जेष्ठ रमेश काका सरोदे. मंडळाचे अध्यक्ष देविदास शर्मा. विनोद भाऊ सुकाळे. दिलीप भाऊ झापर्डे. अरूण भाऊ कडवकर. विक्की देशमुख. बंटी देशमुख. जसबिरसिंग चव्हाण.भागीरथी बाई शेळके. सुशिलाबाई आवलकर. आशाबाई अंधारे. ईन्दुबाई गायकवाड. मंगला बाई बावस्कर. पार्वतीबाई सुकाळे. वर्षाताई देशमुख. पुष्पाताई पवार. संगिताबाई वाघोळे.निताताई अंधारे. शकुंतलाबाई ढवळे. अबिंकाबाई काटकर. शालिनीताई देशमुख,जयश्री  झापर्डे.जयाबाई सुकाळे. शिवानी अंधारे. मीनाताई शिंदे.जानव्ही शर्मा. आदीची उपस्थिती होती. अशी माहिती श्री सदगुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाचे वतीने देण्यात आली.

Previous Post Next Post