आज पासून वरणगाव येथे पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणास सुरुवात...


 वरणगाव प्रतिनिधी - सुनिल पाचपोळ 

भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे वरणगाव सिव्हिल सोसायटी व वरणगाव पोलीस स्टेशन च्या संयुक्त विद्यमाने आज पासून पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण आणि मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती वरणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीपकुमार बोरसे यांनी दिली आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन घेण्यासाठी मोठ्या शहरांमध्ये जावे लागत आहे यासाठी आपण समाजाचे काहीतरी देणे लागते  म्हणून वरणगाव सिव्हिल सोसायटी आणि वरणगाव पोलीस स्टेशनच्या विद्यमाने आज पासून स्पर्धा परीक्षा व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण आणि मार्गदर्शनाचे आयोजन वरणगाव येथील महात्मा गांधी विद्यालयात मध्ये करण्यात आलेले आहे या प्रशिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना सखोल अशी माहिती देण्यात येणार आहे या कार्यक्रमासाठी आज ग्रामीण भागातील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते हे प्रशिक्षण सात दिवस सुरू राहणार असून या सात दिवसांमध्ये टॅलेंट विद्यार्थ्याची निवड करून त्यांना पुढील दोन महिन्यांमध्ये स्पर्धा परीक्षा व पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण देण्यात येणार आहे अशी माहिती प्रशिक्षक संजय घुगे यांनी दिली आहे याप्रसंगी डॉक्टर भोईटे सर निलेश झोपे कमलेश येवले अनिकेत चव्हाण रामचंद्र पाटील उपस्थित होते.

Previous Post Next Post