राजर्षी शाहू बँक शाखा जळगाव जामोद यांच्या वतीने दिनांक २७ जुलै रोजी RC24 न्युजच्या वृत्त निवेदिका कु नेहा कैलास सूर्यवंशी यांची RC24 न्युजच्या वृत्त संपादक पदी नियुक्ती झाल्याबद्दल राजर्षी शाहू बँक जळगाव जामोद शाखेकडून कुमारी नेहा सुर्यवंशी हिचा पुष्प गुच्छ व राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची प्रतिमा देऊन सामाजिक ऋण म्हणून शाहु बँकेच्या वतीने सत्कार करण्यात आला.या सत्काराच्या कार्यक्रमाला अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार मार्गदर्शक कैलास बाप्पू देशमुख, बँकेच्या व्यवस्थापक सौ नूतन वाघ, अतुल मुरांडे, सौ पुष्पाताई वाघ ,सौ सिंधुताई वाघ, कैलास सूर्यवंशी,शिक्षण सभापती तथा नगरसेवक रमेश ताडे,RC24 न्युजचे संपादक राजेश बाठे,मनोज वाघ,प्रणव ताडे,RC24 न्युजचे बुलढाणा जिल्हा विशेष प्रतिनिधी अनिल भगत,धीरज दंबेलकर ,अनंता हुरसाळ यांचेसह असंख्य पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. यावेळी कुमारी नेहा सूर्यवंशी हिने राजर्षी शाहू बँकेच्या सत्काराप्रती आभार मानले.
वृत्त निवेदिका कु.नेहा सुर्यवंशी यांची RC24 न्युजच्या वृत्त संपादिका पदी निवडीचा राजर्षी शाहू बँकेच्या वतीने सत्कार...
जळगांव जा.तालुका प्रतिनिधी:-