चिखली येथील युवा साहित्यिक आणि शब्दों का सफरनामा या पुस्तकाचे लेखक प्रतीक प्रेमराज भाला यांना विविध संस्थेकडून बारा साहित्यिक पुरस्कार घोषित झाले आहे. प्रतीक प्रेमराज भाला लिखित शब्दों का सफरनामा या पुस्तकाचे विमोचन फेब्रुवारी महिन्यात झाले होते. अवघ्या सहा महिन्यात त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.ईश्वरी ग्रुप, मुंबई तर्फे अचिव्हर्स अवॉर्ड 2021 (राष्ट्रवादी लेखक श्रेणी ), ओपस कोलोसीयम, संभलपूर, ओडिसा तर्फे ओपस टॅलेंट अवॉर्ड 2021( प्रथम पुस्तक लेखक श्रेणी ), सिली फोल्क प्रोडकशन, मुंबई तर्फे रायटर्स इंक अवॉर्ड, डॉ ए पी जे अब्दुल कलम रीसर्च फॉउंडेशन, नवी दिल्ली,तर्फे कलाम रत्न पुरस्कार ( सामाजिक जागरूकता लेखन श्रेणी ), फायरबॉक्स मीडिया हाऊस, बेंगलुरू तर्फे, फायरबॉक्स ऑथर अवॉर्ड 2021 हे पाचं अवॉर्ड भेटले आहे. या सोबत इंडिया आवाज, गुवाहाटी, आसाम तर्फे 100 टॉप ऑथर अवॉर्ड 2021, इंडिया प्राईम अवॉर्ड, नयी दिल्ली तर्फे 100 टॉप ऑथर, एज्यूकेशनलिस्ट अवॉर्ड 2021, इंडिया बुक, दिल्ली तर्फे, इंडिया बुक अवॉर्ड 2021, ओपस कोलोसीयम, संभलपूर, ओडिसा तर्फे लाईम लाईट अवॉर्ड ( राष्ट्रवादी श्रेणी ), रायजींग स्टार, मुंबई तर्फे, इंडिपेंडेन्ट इंडियन आयकॉन ( युवा रत्न श्रेणी ), एलीट बुक आणि मीडिया डिजिटल गोलगप्पा, मेरठ तर्फे ईलाईट बुक अवॉर्ड 2021, भारतीय युवा,पुणे तर्फे भारतीय युथ फेस 2021 हे पुरस्कार घोषित झाले आहे.प्रतीक यांची आंतरराष्ट्रीय लेखक समूह मध्ये सदस्य म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. प्रतीक हे लेखक सोबत तब्बल 200 हुन जास्त पुस्तकात सहलेखक आहे आणि त्यांना भारताचा सर्वात मोठा स्टोरीटेलिंग मीडिया नोजोतो मध्ये कांस्य पदक भेटले आहे. त्यांना स्टोरीमिरर तर्फे लिटररी कॅप्टन म्हणून सुद्धा भूषवण्यात आले आहे. प्रतीक यांच्या गौरव पुरस्कारांना अनेक राष्ट्रीय प्रसार माध्यमांनी दुजोरा दिला आहे. अनेक प्रसार केंद्र आणि लिटकॉइन मॅगझीन, वंडरकाईन्ड मॅगझीन यांच्या पृष्ठ भागावर प्रतीक यांचे कौतुक सुद्धा झाले आहे आणि त्यांना अनेक संस्थांनी सामान्य लेखक ते सेलिब्रिटी लेखक म्हणून उपाधी सुद्धा दिली आहे. अनेक जेष्ठ साहित्यिकांनी प्रतीक चे गौरव केले आहे. तब्बल 20 प्रकाशन समूहांनी त्यांना वृतपत्र, मॅगझीन, अवॉर्ड द्वारे सम्मानित केले आहे व त्यांना शुभेच्छा दिल्या आहे. राष्ट्रीय साहित्यिक मंचा वर नाव गाजवल्या नंतर आता ते विस आंतरराष्ट्रीय पुस्तकात सुद्धा सहलेखक झाले आहे. मराठी, हिंदी, राजस्थानी, आसामी, इंग्लिश या भाषेत त्यांनी अनेक कविता लिहिल्या आहे. त्यांचे लेखन राष्ट्रभक्ती, निसर्गभक्ती, धार्मिक, सामाजिक आणि हिंदुत्व विचारधारे वर आधारित असतात.
प्रतीक प्रेमराज भाला यांना 12 साहित्य पुरस्कार घोषित....
बुलढाणा जिल्हा विशेष प्रतिनिधी:-अनिल भगत.
