देशाची 17 वर्षे सेवा करणाऱ्या फौजी अशोक सखाराम श्रीनाथ यांची इंडियन आर्मी मधून सेवानिवृत्त झाल्यावर आसलगाव वाशियांनी केले सन्मानपूर्वक स्वागत...

बुलढाणा जिल्हा.प्रतिनिधी: - सुरज देशमुख.

 भारत देशामध्ये जय जवान जय किसान असा नारा दिला जातो कारण या दोन व्यक्ती मुळे आज भारत हा सक्षम असल्याचे दिसून येते किसान हा अन्न देतो तर जवान हा भारतवासियांचे रक्षण करतो,अश्याच भारत भू चे रक्षण करणे भारतीय सुरक्षा रक्षक म्हणजे इंडियन आर्मी चे जवान हे सतत आपल्याला संरक्षण देत असतात,आज दि 2 ऑगस्ट रोजी आसलगाव येथील फौजि अशोक सखाराम श्रीनाथ हे इंडियन आर्मी मधून सेवानिवृत्त झाले आहेत ते आज सकाळी 10 वाजता आपल्या घरी आसलगाव येथे परतले, आसलगाव वाशीयांचे वतीने त्यांच्या स्वागत करण्यासाठी जयत तयारी करण्यात आली होती अशोक श्रीनाथ हे आसलगाव येथे आले असता कॉटनमार्केट येथे त्यांचे आई - वडील, पत्नी समवेत सत्कार करून गावात स्वागत मिरवणूक काढण्यात आली, कॉटनमार्केट ते ग्रामपंचायत पर्यंत मिरवणूक काढून ग्रामपंचायत येथे सरपंच सुनील डीवरे, उपसरपंच गणेश गिर्हे, ग्रा. सदस्य कर्माचारी बांधावांच्या वतीने त्यांचा सत्कार करून आसलगाव नगरीत स्वागत करण्यात आले.स्वागत कार्यक्रम रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात आसलगावतील सर्व लहान थोर, जेस्ट युवक मोठया संख्येने उपस्थित होते.

Previous Post Next Post