पंधरा कुटुंबाना महिन्याभराचे राशन.सामजिक सदभावना मंच चा स्तुतीपूर्ण उपक्रम...


 राजु भास्करे /चिखलदरा 

चिखलदरा तालुक्यातील जामली आर या अतिदुर्गम गावात अतिवृष्टीमुळे अनेक घराची पळझड झाली होती. तसेच कोरोना काळात अनेक कुटुंबाचा रोजगार सुद्धा हिरावला गेला होता त्यात कित्येक परिवारातील सदस्यांची जीवितहानी सुद्धा झाली होती अशा परिवाराला या दुःखाच्या दरीतून काढण्याकरिता सदभावना मंच ने पुढाकार घेतला असून पंधरा कुटुंबातील सदस्यांना एक महिना पुरेल एवढे धान्य, किराणा किट,गरजूंना कपडे, ब्लॅंकेट, विद्यार्थ्यांना वही बुक पेन,तसेच अनवाणी पायांना चप्पलचा पण वाटप करण्यात आले आहे. मेळघाटात यावर्षी सर्वाधिक पाऊस पडला यात सर्व जनजीवन विस्कळीत झाले. नादिनाल्याला मोठ्या प्रमाणात पूर येऊन बऱ्याच शेतकऱ्याची शेती वाहून गेली. बऱ्याच घराची पळझड झाली त्यामुळे आदीवासी कुटुंब उघड्यावर आले . नेमकी हीच बाब लक्षात घेता सदभावना ग्रुप परतवाडा ह्याच्या लक्षात येताच ते मेळघाटातील आदिवासी कुटुंबाच्या मदतीला धावून आले. त्यांनी आदिवासी बांधवा समोर आपले विचार मांडत सांगितले की सदभावना मंच हे नेहमी गरीब लोकांच्या मदतीला धावत असून कोरोना काळातही अनेक रुग्णावर मेळघाटात फुकट उपचार केले.57 डॉक्टर लोकांची चंमू असून त्यांचे कार्य सध्या संपूर्ण महाराष्ट्रात काम करीत आहेत. भूकंप असो की पुरपाणी असो यात क्षतीग्रस्त कुटुंबाला एक मदतीचा हात म्हणून सदैव पुढाकार असतो. सामाजिक सदभावना मंच महाराष्ट्र नेहमीच आपल्या समाज उपयोगी उपक्रम मध्ये अग्रेसर असल्याचे आपणं सर्वांनी बघितले आहे..चिखलदरा तालुक्यातील टेंब्रुसोडा जवळील जामली आर या गावाला अतिवृष्टी मुळे चांगलाच फटका बसला,तेथील स्थानिक आदिवासी बांधवांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले,तेथील 15 कुटुंब असाह्य व्यवस्थेत सापडलेले त्यांना दैंनदिन गरजेच्या वस्तू साठी खूप धडपड करा लागत आहे. अशी व्यथा तेथील स्थानिक पत्रकार मंडळी नी सामजिक सदभावना मंच चे अध्यक्ष श्री.डॉ.राम ठाकरे यांना फोन द्वारे सांगितली,त्यांची व्यथा ऐकून डॉ.राम ठाकरे यांनी मंच त्या सर्व 15 कुटुंबांना 1 महिन्याचा संपूर्ण किराणा,स्वेटर,ब्लँकेट,पादत्राणे व त्या 15 कुटुंबातील  चिमुकल्या बालकांना शालेय वस्तू वाटप करण्याचा निर्धार केला..डॉ.राम ठाकरे यांच्या हाकेला समाजातील सर्व क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती मदती साठी समोर येवू लागले,अचलपूर सरमसपुरा पोलीस स्टेशन चे ठाणेदार .शेख साहेब  व .प्रकाशजी काळे यांनी या कुटुंबासाठी स्वेटर व ब्लँकेट दिले.भूगाव येथील प्रतिष्ठित नागरिक .राजाभाऊ ब. ठाकरे यांनी व परतवाडा येथील समाजसेविका सौ.दिपलीताई म . विधळे यांनी धान्य पुरविण्याचे प्रतिपादन केले..परतवाडा येथील मंझील सोसायटी तर्फे .ख्वाजा अहमद ,.आदिल शहरयार, प्रा.सय्यद इम्रान अली,शकील भाऊ कुरेशी,झाकीर शेख यांनी सुध्दा मदती साठी हाथ पुढे केला.वैभव  एन काळे  व  संदिप जोशी आय सी आय  बँक मॅनेजर यांनी  सुध्दा मदतीचा हात पुढे केला.जर समाज जात धर्म विसरून माणूस या नात्याने माणसाशी माणसासम वागला तर समाज पुढील कुठलीही समस्या ही समस्या राहणार नाही याचे जिवंत उदाहरण सामजिक सदभावना मंच समस्त मनुष्य जाती ला दिले आहे..सामजिक व धार्मिक एकता ही समाजाला अधिक बळकट बनवते,व दुर्बल व गरजूंना आत्मिक व मानसिक बळ प्रधान करते हे यामधून दिसून आले आहे..संत तुकडोजी महारजांनी म्हंटले ले ' माणूस द्या मला माणूस द्या" खऱ्या अर्थाने पूर्णत्वास येत असल्याचे दिसून येत आहे सामजिक सदभावणा मंच तर्फे उपक्रम यशस्वी याकरिता डॉ.अमोल मळसणे, .विशाल रेवलानी,डॉ.सामी उल्ल्हाह,डॉ.सचिन गावंडे ,डॉ.चेतन बिसने,.निखिल इंगळे यांनी अथक परिश्रम घेतले..यावेळी मंच तर्फे रामदासजी बेदरकर,.ऋषी खेतान,.इम्रान अहमद,पत्रकार .अजय काकडे,.प्रफुल कुरहेकर,.प्रज्वल सुरत्ने, राकेश चंदेल,.अक्षयभाऊ खडके, श्री.विश्वनाथ शनवारे,रामकिसन कासदेकर ,रंगलाल जमुंनकर,श्री. बाबुलाल जावरकर,गजानन येवले व .राजा जावदे  प्रामुख्याने उपस्थित होते.सदभावना ग्रुप हे नेहमी गोरगरिबांना मदतीला धावत असून बाकीच्या लोकांनी सुद्धा गोरगरिबांच्या सेवेकरिता पुढाकार घ्यावा त्याच्या भावना पण समजून घ्यावे मानवसेवा हीच ईश्वर सेवा समजून कोणताही प्रकारचा अनुचित खर्च न करता मानवसेवेत खर्च केल्यास ईश्वर प्राप्ती होईल व जीवन सार्थकी जाईल असे बालरोगतज्ज्ञ डॉ. राम ठाकरे यांचे मत आहे

Previous Post Next Post