एचआयव्ही सह जगणारे 51 गरजू परिवाराला मदतीचा हात,ऊँ सिद्धगुरु नित्यानंद प्रतिष्ठानचा पथदर्शी उपक्रम...


 वरणगाव प्रतिनिधी-सुनिल पाचपोळ 

कोरोना महामारी आणि सतत होणारी संचारबंदी यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडून पडले असून त्यातच जे जे कुटुंब एचआयव्ही संसर्गित आहे त्यांच्या परिवाराला तर जगणे अवघड झाले आहे. ही बाब लक्षात घेत ऊँ सिद्धगुरु नित्यानंद प्रतिष्ठान भुसावळ तालुक्यातील वरणगाव तर्फे अश्या परिवाराला एक महिन्याचा किराणा सामान भेट देणारा हा पथदर्शी उपक्रम आहे,असे  गौरवास्पद प्रतिपादन आ. संजय सावकारे यांनी आज केले.आज वरणगाव येथील वासुदेव नेत्रालयाच्या प्रांगणात डॉ. नितु पाटील यांच्या पुढाकाराने ऊँ सिद्धगुरु नित्यानंद प्रतिष्ठान भुसावळ सोबत आर्थिक दात्यांच्या मदतीने तालुक्यातील एचआयव्ही संसर्गित 51 परिवाराला प्रामुख्याने संक्रमित लहान मुले आणि विधवा महिलांना मदतीचा हात म्हणुन किमान 1एक महिना  पुरेल एवढा किराणा भेट देण्यात आला. भुसावळ शहरातील नुतन आदित्य सुपर मार्ट येथील कर्मचारी वर्गाने अतिशय उत्तम प्रकारे सामान पिशवीत भरून देण्यात आले.यावेळी डॉ. निलेश चौधरी (गिरीजा हॉस्पिटल, भुसावळ),रवी भाऊ निमानी( विघ्नहर्ता पब्लिकेशन, भुसावळ),सुनील सरोदे(सुरत),नितीन चौधरी (चौधरी लॅब, वरणगाव),विनायक फालक ( आदित्य सुपर स्टोर),समीर भाऊ पाटील ,भुसावळ,विजय भंगाळे, सचिन इंगळे आदी उपस्थित होते.पुढे ते म्हणाले की,ऊँ सिद्धगुरु नित्यानंद प्रतिष्ठान मागील चार वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जपत विविध जनहितार्थ उपक्रम राबवित आहे.या करोना काळात केलेले विविध जनहितार्थ उपक्रम आणि सोशल मीडियावर जनजागृती पर लेख नक्कीच दखल घेण्यासारखे आहे. किराणा किट मध्ये गव्हाचे पीठ, तांदूळ, डाळ,चहा पावडर, साखर, शेंगदाणे,मीठ,तेल,कपडे धुण्यासाठी साबण, अंघोळीचा साबण भेट देण्यात आली.सदर गरजू परिवारांची नावे सौ. सुनीता तायडे आणि दत्ता गुरव यांनी पाठवली तर उपक्रम यशस्वीते साठी कपिल राणे,अंकुश गवळी,ल,दीपक फेगडे,आमीन शेख, मझर शेख, राहूल कोचुरे,प्रकाश फेगडे,भारती पाटील,ज्योती गुरव,नथु चौधरी,पूनम पाटील,साधना बडगुजर, मीनाक्षी राणे आदी यांनी अथक परिश्रम घेतले.

Previous Post Next Post