राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी
मेळघाट मधे दिवसेंदिवस वन्यप्राण्यांचा वावर वाढले असल्याने मोठ्या प्रमाणात हल्ले होत असताना चिखलदरा तालुक्यातील मोझरी गावातील एका शेतकऱ्याच्या बैलजोडीवर आज वाघाने हल्ला केल्याने बैलांना गंभीर जखमी केले आहे.व्याघ्र प्रकल्पच्या सीमा गावापर्यंत सीमा विस्तारल्याने मेळघाट मधील माणसे तसेच पाळीव प्राण्यावर मोठ्या प्रमाणात वन्यजीवांचे हल्ले वाढले असताना आज मोझरी येथील शेलूकर यांच्या लाल रंगाच्या बैलजोडीवर हल्ला केल्याने गंभीर जख्मी केले. वनविभागाला सदर घटनेची माहिती देण्यात आली आहे.वृत्त लिहस्तोवर पंचनामा साठी वनविभागाचे चमू आले नव्हत्ते.
