वंचित बहुजन आघाडी च्या वतीने अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी...

जळगांव जामोद प्रतिनिधी:- 

जळगांव जामोद शहरातील स्थानिक एकता नगर येथे दिनांक १/८/२०२१ रोजी लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा सौ विशाखा ताई सावंग ह्या होत्या सर्वप्रथम लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले व उपस्थित महिलांना त्यांनी मार्गदर्शन केले,आपल्या मार्गदर्शणात लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या जिवनचरित्रावर प्रकाश टाकला आणि कोरोणा रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कशाप्रकारे प्रयत्न करावे हे समजून सांगितले त्याचप्रमाणें वंचित बहुजन आघाडी हि सर्व वंचित घटकांच्या हक्कासाठी लढत असुन वंचित समुहातील महिलांनी पक्षात प्रवेश करुन पुढे यावे आणि सर्व पदाधिकारी यांनी सभासद नोंदणी करण्यासाठी  लोकांना सभासद नोंदणीचे महत्व समजावून सांगावे असे आवाहन सुद्धा सौ सावंग ताई यांनी केले,या कार्यक्रमाला महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा सौ पार्वताबाई इंगळे, तालुका अध्यक्षा सौ सुनिताताई हेलोडे, शहर अध्यक्षा सौ सोनम ताई वानखडे, पुष्पाताई इंगळे,संगिता ताई ससाने,आरतीताई गव्हांदे, वंदनाताई ईंगळे,भारती धुंदाळे, उज्वला जाधव, रुख्मिणी वडनेरकर,गौकर्णाबाई बोदडे, सरिता पवार,राजकण्या तायडे,सह इतर बहुसंख्य महिला हजर होत्या या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सोनम ताई वानखडे तर प्रास्ताविक सुनिताताई हेलोडे,व आभारप्रदर्शन पार्वताबाई इंगळे यांनी केले.

Previous Post Next Post