वरणगाव बस स्टॅन्ड ते स्टेशन रोड चे डांबरीकरणाचे काम मागील दोन ते तीन महिन्यापूर्वी झाले मात्र पहिल्याच पावसाळ्यात रस्त्याला खड्डे पडले आहे.परिणामी शासन निधीचा म्हणजे जनतेच्या पैश्यांचा अपव्यव सबंधित ठेकेदारांने केलेला आहे.ठेकेदाराच्या या बेशरमी कामाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वरणगाव शहर तर्फे बेशरमीच्या झाडाचे बस स्टँड चौकात वृक्षारोपण करून निषेध व्यक्त केला त्याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव जिल्हा उपाध्यक्ष राजुभाऊ चौधरी,तालुकाध्यक्ष दिपकभाऊ मराठे, युवक जिल्हा उपाध्यक्ष वाय आर पाटील सर,ओबीसी विभाग तालुकाध्यक्ष मनोज कोलते, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष पप्पूभाई जकातदार, सुधाकरभाऊ जावळे, महिला शहराध्यक्ष रंजनाताई पाटील, माजी नगरसेवक रवींद्रभाऊ सोनावणे,तालुका उपाध्यक्ष प्रकाशभाऊ नारखेडे, युवक तालुका उपाध्यक्ष सागर सरोदे, ओबीसी विभाग शहराध्यक्ष हिमालय भंगाळे, ओबीसी विभाग चिटणीस प्रशांत बोंडे, अहेसान अहमद, राजू चौधरी (मिट्टी), इफ्फा मिर्झा, महेश सोनावणे, ओबीसी विभाग उपाध्यक्ष उल्हास पाटील, रवींद्र पाटील, अनिल चौधरी, शरद देशमुख, सूर्यकांत माळी, प्रकाश पाटील, मयूर चौधरी, आकाश झोपे, लखन चौधरी, कौस्तुभ पाटील, दिलीप कोळी, ओम दिलीप गायकवाड व इतर कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते
वरणगाव शहरांतील बस स्टँड चौकात ठेकेदाराच्या बेशर्मी कामाच्या विरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे बेशरमीच्या झाडाचे वृक्षारोपण केले...
वरणगाव प्रतिनिधी - सुनील पाचपोळ
