भुसावळ तालुका प्रतिनिधी:-सुनिल पाचपोळ.
भुसावळ तालुक्यातील पिंपळगाव खूर्द येथील रहिवाशी ज्योती अनिल सपकाळे वय २८ वर्षीय विवाहितेने राहत्या घरात गळफास घेतल्याची घटना घडली, वरणगाव पोलिसांत 306 ,498 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, व तीन आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती वरणगाव पोलिसांनी दिली आहे.याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की , ज्योती सपकाळे हिने घरात कोणीही नसतांना घराच्या पत्राच्या छताच्या पाईपाला दोरीच्या साह्याने गळफास घेवून आत्महत्या केली .मयत सुनिता ही सासरची मंडळी वारंवार त्रास देत होती त्यामुळे तिने आत्महत्याचे पाऊल उचलले अशी फिर्याद सुनीताच्या नातेवाईकाने दिले आहे ,त्यामुळे सुनीताचा पती ,सासू आणि नणंद यांना वरणगाव पोलिसांनी अटक केली आहे सदर घटनेचा तपास पोनाकॉ नावेद अली सैय्यद करीत आहे .