महाराट्रात गेल्या पाच वर्षांपासून शंभर कोटी वृक्ष लागवड अंतर्गत विविध ठिकाणी प्रचंड रोपांची लागवड झाली.परंतु योग्य संगोपन अभावी ते रोपवन मधातच संपून गेल्याच्या बातम्या झळकल्या पुन्हा दुसऱ्या वर्षी त्याच ठिकाणी तसेच रोपवान. ग्रामपंचायती मार्फत मग्ररोहयो अंतर्गत रोपवान होते. एखाद्या अधिकारी किंवा राजकीय नेत्यांचा हस्ते वृक्ष लागवड केल्या जाते एकाच आठवड्यात त्याच खड्यात नवीन वेळी नवीन झाड लावले जाते. यासर्व गोष्टीना फाटा देत वनविभागाचे वनरक्षक विठ्ठल बकाल यांनी ऐतिहासिक वृक्षलागवड करून चार वर्षात दहा ते पंधरा फुट वाढलेले उंच झाडांचे 47440 वृक्ष संगोपन करून फळबाग फुलविली आहे.मेळघाट प्रादेशिक वनविभाग परतवाडा अंतर्गत पूर्वीचे ढाकणा प्रादेशिक वनपरीक्षेत्र आताच्या नवीन विस्तारित क्षेत्रानुसार नवीन नाव सुसरदा वनपरीक्षेत्रात येणाऱ्या गौलांडोह बिट वनखंड 1306 मध्ये 2017 मधील पावसाळ्यात चार कोटी वृक्षलागवड मोहिमे अंतर्गत 31800 विविध प्रजातीचे रोपांची लागवड करण्यात आली. त्यामध्ये प्रामुख्याने आवळा सीताफळ जांभूळ, सागवान कडुलिंब इत्यादीचे प्रजातीचे वृक्ष लागवड करण्यात आले होते. 2018 च्या पावसाळ्यात याचं क्षेत्राला लागून 25 हेक्टर क्षेत्रात तेरा कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमा अंतरागत 27500 वृक्षाची लागवड करण्यात आली.रोपे लावल्यावर त्यामध्ये चरईबंदी व कुऱ्हाड बंदीचे तंतोतंत पालन करण्यात आले. त्यामुळे या झाडांचे संगोपन वनरक्षक बकाल यांनी स्वतःच्या मुलाप्रमाने केले.त्यामुळं सलग पाचवे वर्षात जिवंत रोपांची टक्केवारी पाहली असता 80%असल्याची दिसून आले आहे. ओसाड टेकड्यावर घनदाट जंगल उदयास आले. हे जंगल उभारण्याचे काम विठ्ठल बकाल या वनरक्षकाने केले.जेंव्हा रोपवन केले त्यावेळी ठिकाणी एकही जिवंत झाड नव्हते सर्वत्र चढ उतार रिकाम्या टेकड्या होत्या.आज त्याठिकाणी 47440 जिवंत झाडांची संख्या आहे.आवळा जांभूळ, कडूनिंब इत्यादीची दहा ते पंधरा फुटाची झाडें असून मोठी बाग उदयास आली आहे.सदर रोपवाणाला आजपर्यंत विविध राजकीय सामाजिक व्यक्तींनी भेटी दिल्या आहेत तसेच वनविभागाचे उपवनसंरक्षक अविनाश कुमार यानी ही भेटी देऊन उत्कृष्ट रॊपवन म्हणून स्तुती केली आहे.कार्यक्रम अंतर्गत श्री. विठ्ठल बकाल हे वनरक्षक म्हणून कार्यरत असताना या परिसरातील तब्बल सत्तेचाळीस हजार झाडांची लागवड केली त्यामध्ये जास्तीत जास्त फळांची झाडें लावण्यात आली.
वनरक्षक बकाल यांनी मेळघाट मध्ये सत्तेचाळीस हजार झाडांची फळबाग फुलविली...
राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी
